देवमाणूस मालिकेतून एसीपी दिव्या सिंगची एक्झिट? 'या' नव्या व्यक्तीची होणार एन्ट्री

पण या मालिकेत आता धक्कादायक बातमी समोर येत आहे. 

Updated: Jun 25, 2021, 07:10 PM IST
 देवमाणूस मालिकेतून एसीपी दिव्या सिंगची एक्झिट? 'या' नव्या व्यक्तीची होणार एन्ट्री

मुंबई :  झी मराठी वाहिनी वरील देवमाणूस या मालिकेला सध्या  प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. या मालिकेची कथा आणि त्यातील पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होत्या परंतु या मालिकेत आता खुपच ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळतायत.

मालिकेच्या  ट्रॅकविषयी सांगयाचं झालं तर देवसिंगला एसीपी दिव्याने पकडले असुन त्याला जास्तीस जास्त शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न ती करत आहे. या सगळया प्रयत्नांमध्ये तीला वकील आर्य देशमुखची साथ मिळाली आहे. पण डॉक्टर देखील आता उलट तपासणी करून दोघींना आव्हान देत आहे.

या मालिकेत आता धक्कादायक बातमी समोर येत आहे. चर्चा आहे की या मालिकेत एसीपी दिव्या सिंगच्या जागेवर आता इन्स्पेक्टर शिंदे येणार आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. एसीपी दिव्या म्हणजेच अभिनेत्री नेहा खानच्या भूमिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. पण आता तिच्या एक्झिटमुळे मालिकेत खुपच गोष्टी बदलणार आहे.

 तुम्हाला अभिनेत्री नेहा खानची भूमिका कशी वाटते ? आणि तिला तुम्ही मालिकेत मिस कराल का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.