मुंबई : टिव्ही अभिनेत्री निकिता शर्मानेही लग्नाच्या या सिझनमध्ये सात फेरे घेतले आहेत. निकिताने उत्तराखंडमधील आपल्या गावात अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं आहे. या लग्नाच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.आजकाल राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाच्या खूप चर्चा होत होत्या, अशा परिस्थितीत निकिताने 14 नोव्हेंबर 2021 रोजी तिच्या गावी रोहनदीप सिंहसोबत लग्न केलं. सगळ्या देखाव्यांपासून दूर राहत निकिताने अतिशय साध्या पद्धतीने शिवमंदिरात लग्न केलं आहे.
निकिता शर्माला 'स्वरागिनी' या टेलिव्हिजन मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. त्याचवेळी, करिअरमध्ये चांगलं स्थान प्राप्त केल्यानंतर, ती तिच्या आयुष्याचा एक नवीन टप्पा सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या साध्या लग्नाने चाहते खूप प्रभावित झाले आहेत आणि तिच्या स्टाइलचं खूप कौतुक करत आहेत. निकिताला तिचं आयुष्य खाजगी ठेवणं आवडतं. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने आपलं लग्न साधेपणाने ठेवण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या जोडीदारासोबत कुटुंबीयांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले.
भव्य रिसॉर्ट किंवा फार्महाऊस बुक करण्याऐवजी निकिताने उत्तराखंडमधील शिव मंदिरात लग्न केलं. तिने मॅचिंग रेड कलरच्या दुपट्ट्याने तिचा आउटफिट स्टाइल केला. यासोबत तिने सोन्याच्या दागिन्यांसोबत तिचा लूक पूर्ण केला. या फोटोंसोबतच्या कॅप्शनमध्ये निकिताने खुलासा केला आहे की, तिचं लग्न त्रियुगीनारायण मंदिरात झालं. जिथे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता.