25 वर्षांची रश्मिका मंदाना दोन मुलांचा बाबा असणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात?

 हा अभिनेता आहे तरी कोण ? 

Updated: Dec 31, 2021, 01:39 PM IST
25 वर्षांची रश्मिका मंदाना दोन मुलांचा बाबा असणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात? title=

मुंबई : दाक्षिणात्य कलाविश्वासोबतच विविधभाषी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनं अगदी कमी वेळातच कमालीची लोकप्रियता मिळवली. नॅशनल क्रश म्हणूनही तिचा उल्लेख केला जातो. कोणासाठी ती हावभावांची राणी, तर कोणासाठी मनाची राणी.... पण, या राणीला म्हणजेच रश्मिकाला एक वेगळाच राजा भावला आहे.

रश्मिकाच्या मनावर ज्याचं राज्य आहे त्याचं नाव किंवा त्याची ओळख नव्यानं सांगण्याची गर नाही. कारण ते नाव सतत प्रसिद्धीझोतात असतं.

कोट्यवधी भारतीयांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या रश्मिकाच्या मनाचा ठाव घेतला आहे अभिनेता थालापती विजय यानं.

बसला ना धक्का? ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या निमित्तानं रश्मिका एका कार्यक्रमाला पोहोचली होती. तिथं तिनं आपला क्रश तामिळ सुपरस्टार थालापती विजय असल्याचं सांगितलं.

विजयसोबत एकदा तरी स्क्रीन शेअर करु इच्छि असल्याची बाबही तिनं यावेळी बोलून दाखवली. रश्मिकानं विजयचा उल्लेख आपला ड्रीम बॉय असाही केला.

RIP Bala trends after a Thalapathy Vijay fan allegedly dies by suicide |  Regional News | Zee News

प्रत्यक्ष आयुष्यात दोन मुलांचा वडील असणारा विजय रश्मिकाला भलताच आवडतो असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आता कोणा निर्मात्यानं ऐकलं असेल तर रश्मिका आणि विजयला येत्या काळात एकत्र पाहणं ही मोठी परवणीच असे; नाही का?