मुंबई : 'सैराट' या चित्रपटामुळं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या आणि या कलाक्षेत्रामध्ये स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रिंकू राजगुरू. पहिल्याच चित्रपटातून सर्वांना आपल्या प्रेमात पाडणाऱ्या याच रिंकूनं आपली वेगळी ओखळ तयार केली. (Rinku Rajguru)
आकाश ठोसर याच्यासोबतची तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री भन्नाट जमली आणि प्रेक्षकांना भावलीसुद्धा. मुख्य म्हणजे आकाश आणि रिंकूनं पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करावी अशी इच्छा चाहत्यांनी अनेदकदा व्यक्त केली.
आगामी चित्रपटाचं माहित नाही, मात्र सध्या रिंकू आणि आकाश खास क्षण मात्र एकत्र व्यतीत करत आहेत.
खुद्द रिंकू आणि आकाशनंच त्यांच्या इन्स्टा स्टेटसमध्ये आपल्या खास भेटीचे फोटो पोस्ट केले.
डिनर डेट असं कॅप्शन रिंकूनं दिलं, तर ती माघारी निघालेली असताना तिच्या कारच्या काचेतून दिसणाऱ्या रुपाला न्याहाळत आकाशनं निरोप घेतला.
स्टेटसमधूनच रिंकू आणि आकाशची ही मैत्री किंबहुना मैत्रीपेक्षाही खास नातं सर्वांसमोर आलं.
आता मुद्दा असा, की ही जोडी खरंच प्रेमात आहे का? कारण त्यांच्या पोस्ट आणि कॅप्शन तरी हेच सुचवतात.
तुम्हाला त्यांची केमिस्ट्री पाहून काय वाटतं, कमेंट बॉक्समध्ये कळवा.