सर्वात शॉर्ट ड्रेस घालणारी अभिनेत्री बेडरूमच्या दरवाजावर उभी राहिली आणि...

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स म्हणाले एवढा शॉर्ट घालण्यापेक्षा ड्रेस घातलासच कशाला?

Updated: Feb 1, 2022, 09:15 PM IST
सर्वात शॉर्ट ड्रेस घालणारी अभिनेत्री बेडरूमच्या दरवाजावर उभी राहिली आणि... title=

मुंबई : मनोरंजन विश्वातील सर्वात फॅशन क्वीन म्हणून उर्वशी रौतेलाकडे पाहिलं जातं. उर्वशी हॉट आणि आपल्या छोट्या कपड्यांमधील फॅशनसाठी खूप फेमस आहे. वेगवेगळे फोटो ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहत्यांना आपले अपडेट्स सोशल मीडियावरून देत असते. काही फोटो आणि व्हिडीओमुळे उर्वशी ट्रोल देखील होते. 

उर्वशीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने इंटरनेटचा पारा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. उर्वशीचं सौंदर्य आणि तिचा लूक या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतो. 

उर्वशी रौतेलानं सिल्व्हर कलरचा वन पीस घातला आहे. या ड्रेसमध्ये तिने एक व्हिडीओ शूट केला.यासोबत तिने मॅचिंग कलर हील्स घातलेली दिसत आहे. ती बेडरूमच्या दारात उभी आहे आणि कॅमेऱ्यात ती आपलं सौंदर्य टिपत आहे. 

उर्वशीचा हॉट लूक पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले असल्याचं कमेंट्समध्ये दिसत आहे.काही युजर्सनी तिला ट्रोल देखील केलं आहे. तिच्या अदांमुळे इंटरनेटचा पारा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. 

उर्वशी अरब फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये तिने 40 कोटी रुपयांचा ड्रेस घातल्याची चर्चा आहे. तिच्या या ड्रेसची सोशल मीडियावरही खूप चर्चा रंगली होती.