अभिनेत्री ऋजुता देशमुखला टोल नाक्यावर आला वाईट अनुभव, तुम्हालाही बसेल धक्का

सोशल मीडियावर ऋजुताने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे अभिनेत्रीने तिला नुकताच आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे. हा धक्कादायक अनुभव तिला खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ आला आहे.

सायली कौलगेकर | Updated: Aug 7, 2023, 01:44 PM IST
अभिनेत्री ऋजुता देशमुखला टोल नाक्यावर आला वाईट अनुभव, तुम्हालाही बसेल धक्का  title=

मुंबई : अभिनेत्री ऋजुता देशमुख सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ऋजुताने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे अभिनेत्रीने तिला नुकताच आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे. हा धक्कादायक अनुभव तिला खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ आला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओला तिने, तुम्हाला काय वाटतं??? अश्या अनेक गोष्टी घडतात आणि आपण किंवा मी गप्प बसते... कारण परिणाम होईल याची खात्री नसते. या वेळी मनात आलं, बोलून बघूया!! खरंच असा नियम आहे का? आणि असला तर तो बरोबर आहे का? असं कॅप्शन तिने दिलं आहे.

या व्हिडिओच्या सुरुवातीला ऋजुता, ''नमस्कार मी अभिनेत्री ऋजुता देशमुख आत्ताच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आलेला अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे. माझं माहेर पुण्याचं पण मुंबईला येवून राहून आता मला 25 वर्ष झालीयेत. त्यामुळे तशी मी मुंबईचीच झालीये. पण पुण्याला माझे आई-वडिल असतात सासू सासरे असतात त्यामुळे पुणे-मुंबई येणं जाणं खूप जास्त आहे माझं. तर 31 जुलैला मी पुण्याला गेले आणि गाडी घेवून गेले. प्रत्येकवेळेला गाडी घेवून जात नाही. पण यावेळेला गाडी घेवून गेले. आणि जेव्हा केव्हा गाडी घेवून जाते. तेव्हा माझं कुटूंब माझ्यासोबत असतं. माझा नवरा माझी मुलगी. तेव्हा अनेकदा आम्ही लोणावळ्यात जातो. एका ठिकाणी मनशक्तीला जातो. चहा मिसळ हे सगळं खाण्याची आम्हाला दरवेळेला सवय आहे. आणि आम्हाला आवडतं तिथे जायला. तर तिथे जाऊन आम्ही पुण्याला गेलो. आणि टोलवर तुम्हाला माहितीये मॅसेजेस किंवा मेल आहेत ते उशिरा येतात. तर जनरली खालापूरला दोनशे चाळीस रुपये घेतले जातात. आणि तळेगावला अंशी रुपये घेतेले जातात. पण एका वेळेला  240 आणि एकेवेळेला 80 रुपये घेतले जातात. 

पुण्याला गेल्यावर माझ्या लक्षात आलं. तो पर्यंत आम्ही घरी पोहचलो कारण मी ड्राईव्ह करत होते. घरी पोहचले तेव्हा मॅसेज माझ्या नवऱ्याला येतो. तर शिरीष म्हणाला की, अगं  240 आणि  240 असे पैसे कट झालेत. तर मी मेल चेक केला. त्याच्यावरही सेम होतं.  240 आणि  240 असे पैसे अकाऊन्टमधून कट झाले होते. तर मग मी मेल करुन काही करता येतंय का. काही हेल्प होतेय का बघत होते. मी मेल केला. तर माझी तक्रार रजिस्टर झाली. आणि त्यांचा मेलही आला की, मला काही डॉक्यूमेंट्स द्या. त्यांना जे काही डॉक्यूमेंट्स हवी होती ती मी त्यांना मेल केलं. त्याच्यानंतर त्यांचा काही रिवर्ट आलेला नव्हता. पण लगेच नेक्ट डे 1 ऑगस्टला मी परत मुंबईला जाणार होते. तेव्हा मी गाडी बाजूला लावली. आणि जाऊन टोलपाशी हे बोलून आले. मला मॅनेजरशी बोलायचं आहे. असं असं झालंय. 

याच्यावर काय उपाय आहे. तर मॅनेजर आले ते माझ्याशी बोलले. आणि त्यांनी मला पहिला प्रश्न हा विचारला की, तुम्ही लोणावळ्यात उतरला होता का? तर मी असं म्हणाले की, हो पण मी दरवेळेला लोणावळ्यात उतरते. कारण आम्हाला आवडतं. आणि आम्ही परत एक्सप्रेस वेवर येतो. तर त्यांनी मला असं सांगितलं की, आता दोन भाग झाले आहेत. मुंबई ते लोणावळा  240 रुपये आणि पुणे ते लोणावळा 240 रुपये. तर मी त्यांना म्हणाले हे कधी सुरु झालं. तेव्हा ते म्हणाले जेव्हापासून फास्टटॅग सुरु झालाय तेव्हापासूनच हे सुरु झालंय. तर मी त्यांना म्हणाले फास्टटॅग जेव्हापासून सुरु होवून पण आता दोन एक वर्ष झाली असतील. पण तेव्हापासून मी पुण्यात आलेच नाही असं तर नक्कीच झालं नाही.

 तर मी दरवेळेला येते. मी तुम्हाला आधीचे पण मेल्स दाखवू शकते की,  240 आणि ८० रुपये कट झालेत. आणि मी लोणावळ्यात जाऊन आलीये. तर याच वेळेला  240 आणि  240 असे का कट झाले. तर त्याचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. तर त्यांनी असं सांगितलं की, नियमात असंच बसतं. कि हे दोन टप्पे केले आहेत. मुंबई ते लोणावळा  240 रुपये टोल आणि पुणे ते लोणावळा  240 रुपये टोल तर अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, मुंबई ते लोणावळा हे अंतर जास्त आहे. आणि लोणावळा ते पुणे हे अंतर कमी आहे. तर मी चेकही केलं की, मुंबई ते लोणावळा हे अंतर 83 किलोमीटर आहे. आणि पुणे ते लोणावळा हे अंतर 64 किलोमीटर आहे. तर अर्थातच 20 किलोमीटरचा फरक आहे. तर काय नवीन नियम केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा अनुभव तुम्हालाही आलाय का? मेलपर्यंत जे मी करण्याचा प्रयत्न केलाय ते तिथपर्यंतच गेलंय. त्यांनी मला विचारलेल्या गोष्टी मी सगळ्या त्यांना मेल केल्या आहेत. पण त्यांचा काही रिप्लाय मला आलेला नाही. आणि टोल नाक्यावर तर मला असं उत्तर दिलेलं आहे. कर हे बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं? अंतर वेग-वेगळं असताना 240 अधिक  240 हे टोल आकारणं हे बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं. मला यात काहीतरी बदल व्हावा असं नक्की वाटतं. थँक्यू'' असा व्हिडिओ शेअर करत तिने संताप व्यक्त केला आहे.