preganancy नंतर 'या' अभिनेत्रीला वेदना झालेल्या असह्य; ऐकून तुमच्याही अंगावर येईल काटा

अभिनेत्री समीरा रेड्डी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

Updated: Aug 6, 2022, 12:44 PM IST
preganancy नंतर 'या' अभिनेत्रीला वेदना झालेल्या असह्य; ऐकून तुमच्याही अंगावर येईल काटा title=

मुंबईः अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या बॉलीवूडपासून दूर आहे. पण ती तिच्या फिटनेस आणि डाएटवरून सध्या चाहत्यांची मनं जिंकून घेते आहे. समीरा रेड्डीला आत्तापर्यंत बॉलीवूडच्या अनेक कर्मशियल चित्रपटांमधून सगळ्यांनीच पाहिले आहे. आपल्या बॉलीवूडच्या ब्रेकमुळे ती मध्यंतरी चर्चेत आली होती. सोशल मीडियावरून ती आपल्या फिटनेसचे फोटो टाकत असते.

'आता तू वयात आली आहेस', 'तू म्हातारी दिसते आहेस' आणि 'आता तूझे केसही पांढरे दिसायला लागले आहेत', अश्या एक नाही तर हजार कमेंट्स देत समीराला मध्यंतरी मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले होते. पण याबाबतीत तिला इंडस्ट्रीतील लोकांकडून तसेच तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पांठिबा मिळाला होता. जर चाळीसीच्या वयात पुरूष पांढरे केस ठेवू शकतात तर स्त्री का नाही? असं म्हणत समीराला अनेकांनी सपोर्ट केला. अभिनेत्री समीरा रेड्डी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने पुन्हा एकदा आपल्या फिटनेसबद्दल खुलासा केला आहे.

तिला गरोदरपणानंतर शारिरिक त्रासाला समोरे जावे लागले होते याचा खुलासा तिने केला आहे. ती म्हणाली की, ''प्रेग्नंन्सीनंतर मला कंबरदुखीचा खूप त्रास झाला होता. माझ्या शूटिंगच्या दिवसांमध्ये तसेच माझ्या बाळंतपणानंतर माझी पाठ खूप जास्त दुखायला लागली होती. यामुळे मला काम करतानाही फार त्रास झाला होता.  गेल्या 2 महिन्यांत माझी पाठ पूर्णपणे निकामी झाल्यातच जमा होती कारण मला त्या दुखीमुळे असह्य वेदना होत होत्या. मी खूप निराश झाले होते तसेच वैतागलेही होते कारण मला माझा फिटनेस मन्टेन करायचा होता'', असे तिने म्हटले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अशा परिस्थितीत समीराने व्हिटॅमिन ईचे सेवन तसेच आपल्या खाण्यात पालेभाज्या खायला सुरूवात केली. त्याचसोबतच फिझियोथेरपी आणि योगा केल्याने तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे समीराने सांगितले.