घटस्फोटानंतर पहिल्यांदाच समोर आली अभिनेत्री; केलं हटके फोटोशूट... Photo Viral

संजीदा शेखच्या धमाकेदार परफॉर्मन्सचीही लोक आतुरतेने वाट पाहत असतात.

Updated: Oct 9, 2022, 09:57 PM IST
घटस्फोटानंतर पहिल्यांदाच समोर आली अभिनेत्री; केलं हटके फोटोशूट... Photo Viral  title=

Sanjeeda Shaikh photoshoot: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. पण याहीपेक्षा ती तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. संजीदा शेख बऱ्याच दिवसांपासून टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर आहे, मात्र असे असतानाही संजीदा कायम चर्चेत राहते. (actress sanjeeda shaikh shares a new video of her glamours look on instagram fans reacts)

संजीदा टेलिव्हिजनवर आपली फारशी छाप पाडू शकली नाही परंतु ती आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश शैलीमुळे अनेकदा चर्चेत असते. काही काळापासून संजीदा तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळेच चर्चेत आहे असंही म्हणता येईल. 

संजीदा शेखच्या धमाकेदार परफॉर्मन्सचीही लोक आतुरतेने वाट पाहत असतात. ती खूप चांगली डान्सर आहे. (Sanjeeta Shaikh Dance) दुसरीकडे संजीदा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. काळाबरोबर त्याचा बोल्डनेसही वाढतो आहे. आता पुन्हा एकदा संजीदाचा नवा अवतार चांगलाच व्हायरल होत आहे. संजीदाचा हा ग्लॅमरस लुक पाहून सगळेच घायाळ झाले आहेत. 

आणखी वाचा - प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!

लेटेस्ट लूकमध्ये संजीदा हिरव्या रंगाच्या डीपनेक ड्रेसमध्ये दिसत आहे. यादरम्यान तिनं नो मेकअप लूकमध्ये दिसतो आहे. संजीदाने आपले केस मोकळे ठेवले आहेत. कॅमेऱ्यासमोर आपली स्टाईल दाखवत तिनं आपल्या चाहत्यांना घायाळ करून सोडले आहे, असं म्हटलं तर हरकत नाही. आता संजीदाचा हा लूक चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या अवतारात ती खूपच हॉट दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी तिला क्यूट म्हणत कमेंट्स पाऊस पाडला आहे. (Sanjeeta Shaikh Viral Video)

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

संजीदा सध्या 'कुन फया कुन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'मी ते बापू' या पंजाबी चित्रपटात ती दिसली होती. ती अनेक टीव्ही शो, चित्रपट, वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे.