अभिनेत्री सायली संजीव अशोक सराफ आणि निवेदिता यांचीच लेक?

'काहे दिया परदेस या मालिकेतून सायली संजीव घराघरांत पोहचली आहे. सायली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफ मुळे चर्चेत असते.

Updated: Apr 16, 2023, 04:44 PM IST
अभिनेत्री सायली संजीव अशोक सराफ आणि निवेदिता यांचीच लेक?   title=

मुंबई : अभिनेत्री सायली संजीव sayali sanjeev मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. नेहमीच ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर ती स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.  'काहे दिया परदेस या मालिकेतून ती घराघरांत पोहचली आहे. सायली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफ मुळे चर्चेत असते. मात्र अभिनेत्री यावेळी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. कारण अशी चर्चा आहे की, सायली संजीव ही अशोक सराफ Ashok Saraf आणि निवेदिता सराफ यांची मुलगी आहे.

सोशल मीडियावर सायलीचा मोठा चाहतावर्ग आहे. सायली सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. काही दिवसांपुर्वी सायलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमीत्त सायलीची ही पोस्ट होती. या पोस्टमध्ये सायलीने 'हॅपी बर्थडे पप्पा' असं लिहिलं होतं. या शिवाय सायलीने त्यांच्यासोबत एक फोटोही शेअर केला होता. त्यामुळे सायली अशोक सराफ यांची लेक आहे अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत होती. 

पण तुम्हाला सायली आणि अशोक सराफ यांच्यातलं नातं माहितीये का? आज आम्ही तुम्हाला अशोक सराफ आणि सायलीमधील नात्याबद्दल सांगणार आहोत. अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमीत्त पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा देत पप्पा म्हणाली,  याआधीही सायलीने  अशोक सराफ यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले होते. तेव्हाही कॅप्शनमध्ये त्यांचा उल्लेख 'पप्पा' असाच केला. अशोक सराफ यांना ती पप्पा का म्हणाली होती. मात्र दिलेल्या एका मुलाखती मध्ये ती अशोक मामांना पप्पा का म्हणते याचा खुलासा केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका मुखातीमध्ये सायलीने अशोक सराफ यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. एका मुलाखतीत सायलीला 'तु अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलगी आहेस का?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावंर स्पष्टिकरण देत सायली म्हणाली, 'तुम्ही असं समजूच शकता आणि याची मला देखील काहिच हरकत नाही. अनेकजण मला हाच प्रश्न विचारतात. माझं नाव सायली संजीव आहे, माझ्या वडिलांचं नाव संजीव चंद्रशेखर आहे आईचं नाव शुभांगी चंद्रशेखर आहे.' खरंतर अनेकजण तिला तु निवेदिता सराफ यांच्यासारखी दिसतेस असं म्हणतात. त्यांनीही मला नेहमीच त्यांच्या मुलीसारखं वागवलं आहे. म्हणूनच मी त्यांना पप्पा म्हणून हाक मारते.'