अभिनेत्री शिवाली परबने चाहत्यांना दिली गोड बातमी; चाहते करतायेत शुभेच्छांचा वर्षाव

नुकताच शिवालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत शिवालीने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की...

Updated: May 12, 2024, 01:00 PM IST
अभिनेत्री शिवाली परबने चाहत्यांना दिली गोड बातमी; चाहते करतायेत शुभेच्छांचा वर्षाव title=

मुंबई : शिवाली अवली कोहली म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी चेहरा येईल अभिनेत्री शिवाली परबचा.  'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून अभिनेत्री शिवालीला खरी ओळख मिळाली. नुकताच शिवाली तिचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. १० मे रोजी शिवालीने तिचा वाढदिवस साजरा केला. मात्र यावर्षी शिवालीने तिचा वाढदिवसाला स्वत:ला एक मोठं गिफ्ट दिलय.  यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी खूपच खास आहे. नुकताच शिवालीने १० मे रोजी वाढदिवस आणि अक्षय्य तृतीया असा योग जुळून आला असून यादिवशी तिने एक मोठे स्वप्न पूर्ण केलंय. अनेकजण तिला   वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव करत होते तर, तर दुसरीकडे तिने स्व:कमाईने घेतलेल्या घराची पूजा आयोजित केली होती. त्यामुळे अनेकांनी तिचं अभिनंदन केलंय.  अभिनेत्रीचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

नुकताच शिवालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत शिवालीने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''१० मे २०२४ नमस्कार पहिले तर सगळ्यांना खूप-खूप धन्यवाद माझ्या वाढदिवसा निमित्त Call Msg करून शुभेच्छा दिल्यात असाच तुम्हा सगळ्यांचा आशिर्वाद राहूदे आणि या आशिर्वादामुळे मी अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी माझ्या आई बाबांसाठी स्वतचं, हक्काचं एक घर घेतलं...काल गृह प्रवेश ही झाला, आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं जे प्रत्येक माणसाच स्वप्न असतं म्हणजे स्वःतच एक “घर” खर तर हे घर माझं स्वप्न नाही माझ्या आई- बाबांच स्वप्न आहे आणि त्यांचे ऋण कधीच फेडले जात नाही …माझं छोटस gift माझ्या वाढदिवसा निमित्त माझ्या आई बाबांसाठी …इतके वर्ष भाड्याच्या घरात राहिलो हा प्रवास चाळीतून थेट मोठ्या building च्या 2bhk apartment पर्यंतचा होता…प्रवास खूप गोड होता, शिकण्यासारखा होता सगळ्यांचे खूप आभार माझ्या सोबत तुमच्या शुभेछ्या आणि सदिच्छा कायम असुद्या…हा व्हिडिओ यासाठी टाकतेय कारण आई बाबांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम माझ्या स्मरणात राहावा … व्हिडीओ पोस्ट करताना मन भरुन आले आहे , काहीतरी मिळवल्याचा हा आनंद कमालीचा आहे … Thank you everyone.''

शिवालीच्या या व्हिडीओवर तिच्या कुटूंबीयांसोबतच तिच्या चाहत्यांनी आणइ मित्रपरिवारानेदेखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. एकाने कमेंट करत लिहीलंय, खूप खूप अभिनंदन शिवाली, आमच्याकडूनही पूर्ण परब परिवाराकडून खूप सारं प्रेम. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय, खूप खूप अभिनंदन आणि हर्दिक शुभेच्छा. याचबरोबर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.