अभिनेत्रीने शेअर केला आंघोळ करतानाचा व्हिडीओ; कॅमेऱ्यासमोरच तिने...

Sonam Bajwa Video: प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाने (Sonam Bajwa) पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर (Instagram) एका पोस्टमुळे वातावरण तापवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आपले सेक्सी आणि भुरळ पाडणारे फोटो शेअर करणाऱ्या सोनमने आता थेट शॉवरखाली आंघोळ करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यानंतर चाहत्यांकडून या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.   

Updated: May 13, 2023, 05:43 PM IST
अभिनेत्रीने शेअर केला आंघोळ करतानाचा व्हिडीओ; कॅमेऱ्यासमोरच तिने... title=

Sonam Bajwa Video: प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा (Sonam Bajwa) गेल्या काही दिवसांपासून फार चर्चेत आहे. सोनम बाजवा इन्स्टाग्रामवर (Instagram) सतत आपले सेक्सी आणि भुरळ पाडणारे फोटो शेअर करत आहे. यामुळे सोशल मीडियावरील (Social Media) वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान नुकताच तिने थेट आंघोळ करतानाचाच व्हिडीओ शेअर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानंतर तिच्या पोस्टवर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

सोनम बाजवा पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. पंजाबमधील अनेक मोठ्या आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने प्रमुख भूमिका बजावली आहे. दरम्यान, सोनम बाजवा गेल्या काही दिवसांपासून आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे चर्चेत आहे. तिच्या या बोल्ड फोटोंमुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असताना आता मात्र तिने आंघोळ करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटलं असून, काहींना तर धक्का बसला आहे. 

व्हिडीओत सोनम शॉवरच्या खाली उभी असल्याचं दिसत आहे. यावेळी तिने लाल रंगाचा ड्रेस घातलेला असून पाण्यात पूर्ण भिजलेली दिसत आहे. हा व्हिडीओ तिच्या फोटोशूटदरम्यान काढण्यात आल्याचं दिसत आहे. याचं कारण तिने या शूटमधील फोटोही इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत. या फोटोंना काही तासाच लाखो लाईक्स मिळाले आहेत. दरम्यान तिच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 

अनेक चाहत्यांनी तिला पंजाबची Kylie Jenner असं म्हटलं आहे. तर काहींनी गेल्या तीन दिवसांपासून हिने आंघोळ केलेली नाही असं म्हणत खिल्ली उडवली आहे. "गेल्या तीन दिवसांपासून ती त्याच ड्रेसमध्ये आंघोळ करत आहे, तेदेखील विना शॅम्पू आणि साबण", अशी कमेंट एका चाहत्यांने केली आहे. सोनमने तीन दिवसांपूर्वी लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केले होते. 

दरम्यान काही चाहत्यांनी तिच्या हॉट फोटोशूटवरुन टोला लगावत, तू आता बिघडत चालली आहेस, तुझ्यावर सक्ती करावी लागेल असं म्हटलं आहे (Sonam, you are going down the wrong path. We need to be strict with you). 

सोनम बाजवा, 33, पंजाबी सिनेमातील सध्याची सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. 2013 मध्ये 'बेस्ट ऑफ लक'मधून पदार्पण केल्यापासून, सोनमने अनेक मोठ्या आणि आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. 'सरदार जी 2', 'निक्का झैलदार 2' आणि 'कॅरी ऑन जट्टा 2' यांसारख्या काही सुपरहिट चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. 2014 मध्ये, तिने कप्पल मधून तमिळमध्ये पदार्पण केले, त्यानंतर 2016 मध्ये बाबू बंगाराम सोबत तेलुगू इंडस्ट्रीतही पदार्पण केले. सोनमने 'स्ट्रीट डान्सर 3D' आणि 'बाला' यासह काही मोजक्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे.