अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं ७० लाखाचे ब्रेसलेट, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. 

Updated: Feb 6, 2021, 12:02 PM IST
अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं ७० लाखाचे ब्रेसलेट, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री उर्वशी आपल्या युनिक स्टाईलसाठी ओळखली जाते. अभिनेत्री उर्वशी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना तिच्या रुटीनविषयी अपडेट करत रहात असते. सोशल मीडियावर ती नेहमी अॅक्टीव्ह असते.

उर्वशी रौतेला तिच्या एका व्हिडीओ मुळे आता चर्चेत आली आहे. उर्वशीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत उर्वशीने सोन्याचे हिऱ्याने सजवलेलेचे ब्रेसलेट घातले आहे. या व्हिडीओत ती हातातले ब्रेसलेट दाखवताना दिसते आहे. सूत्रांच्या अनुसार उर्वशी रौतेलाचे हे ब्रेसलेट ७० लाखांचे आहे.

https://www.instagram.com/p/CKyBEC8hBhh/

उर्वशी लवकरच एका बायोपिकमध्ये दिसणार आहे. 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सिरीजमध्ये ती रणदीप हुड्डाची पत्नी पूनम मिश्राची भूमिका साकारणार आहे. २०२१ मध्ये वेगवेगळ्या सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये ती दिसू शकते.