अभिनेत्री झरिन खान देतेय 'या' आजाराशी झुंज; पोस्ट शेअर करत दिली माहिती

झरिन आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र सध्या चित्रपटांमुळे नव्हे ती वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे.  आता झरिन खानच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येतेय. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत झरिनने ही माहिती दिली आहे. 

Updated: Aug 16, 2023, 08:49 PM IST
अभिनेत्री झरिन खान देतेय 'या' आजाराशी झुंज; पोस्ट शेअर करत दिली माहिती title=

मुंबई : अभिनेत्री झरिन खान ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीला कतरिना कैफची लुकलाईक सुद्धा म्हटलं जातं. अभिनेता सलमानच्या सिनेमातून सिनेसृष्टी पदार्पण करणारी अभिनेत्री झरिन खान सध्या सिनेसृष्टीतून गायब आहे. जरी अभिनेत्री फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय नसली तरीही ती तिच्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता झरिन खानच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येतेय. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत झरिनने ही माहिती दिली आहे. 

झरिन आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र सध्या चित्रपटांमुळे नव्हे ती वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीला नुकताच डेंग्यू झाला आहे, ज्यामुळे तिच्या शरीरात अतिशय वेदना होत होत्या आणि तापही आला आहे. या आजारामुळे झरीन हिला रुग्णालयातही  दाखल करण्यात आले होते. तिने सोशल मीडियाद्वारे ही माहिती देत हेल्थ अपडेट शेअर केले होते. आता तिची तब्येत पूर्वीपेक्षा बरी असून ती रिकव्हर होत आहे. 

डेंग्यूच्या विळख्यात सापडल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्ट करत तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे ज्यानंतर तिचे चाहते चिंतेत दिसत आहेत. तिच्या चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्री तिच्या हातावरील सलाईनचा फोटो पोस्ट केलाय ज्यावर तिने ''रिकव्हरी मोड'' असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय. यानंतर काही वेळाने अभिनेत्रीने तिची ही स्टोरी डिलीट केली आणि दुसरी पोस्ट टाकली, ज्यामध्ये तिच्या हातात ज्यूसचा ग्लास दिसत आहे. ''रिकव्हरी मोड'' असंही तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे..

झरीन सध्या रुग्णालयात असून तिथे दाखल झाल्यानंतर तिने चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहेत याचबरोबर तिने तिच्या चाहत्यांना  डेंग्यूपासून दूर राहण्यास सांगितलं आहे .मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्या डेंग्यूच्या केसेस वाढत असून, अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि डासांना घरात येऊ देऊ नका, असा सल्ला तिने तिच्या चाहत्यांना दिला आहे. एवढंच नाही तर डासांपासून दूर राहण्यासाठी फुल स्लीव्ह्ज किंवा पूर्ण बाह्यांचेच कपडे घाला, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा,  असं आवाहन तिने तिच्या चाहत्यांना केलं आहे. 

घरच्या घरी करा हे उपाय
डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी, या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काय काळजी घ्यावी ते वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले आहे. जेव्हा, डेंग्यू या रोगाची लागण होते, तेव्हा मानवी शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आहारात १२ ते १५ काळे खजूर, एक किवी फळ, १ ते २ चमचे पपईच्या पानाचा रस समावेश करावा. त्यामुळे शरीरातील प्लेटलेट वाढतात परिणामी डेंग्यूची समस्या दुरावते.