Adipurush चित्रपटात रावणाची भूमिका वादाच्या भोवऱ्यात; सैफने व्यक्त केलेल्या इच्छेमुळे आणखी तापणार प्रकरण?

या चित्रपटापेक्षा सैफ अली खान त्याच्या भुमिकेमुळेच सर्वाधिक चर्चेत आला आहे.

Updated: Oct 6, 2022, 08:03 PM IST
Adipurush चित्रपटात रावणाची भूमिका वादाच्या भोवऱ्यात; सैफने व्यक्त केलेल्या इच्छेमुळे आणखी तापणार प्रकरण? title=

Saif Ali Khan on Mahabharta: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचा विक्रम वेधा (Vikram Vedha) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटानंतर सैफ अली खान प्रभासच्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. (adipurush actor saif ali khan says he want to work in mahabharata in role of karna)

या चित्रपटापेक्षा सैफ अली खान (Saif Ali Khan in Adipurush) त्याच्या भुमिकेमुळेच सर्वाधिक चर्चेत आला आहे. त्याच्या लुकवरून सध्या त्याला जोरदार ट्रोल करण्यात आलं आहे. या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटील आली आहे. चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर सैफ अली खान वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

या वादादरम्यान सैफ अली खान वेगळ्या एका कारणासाठी चर्चेत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सैफ अली खान प्रभासच्या आदिपुरुष (Prabhas in Adipurush) या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र सोशल मीडियावर त्याच्या लूकबद्दल मोठा वादंग उभा राहिला आहे. केवळ नेटिझन्सच नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्सही त्याच्या लूकचा उघडपणे विरोध करत आहेत. पण आता या गदारोळात सैफ अली खानने मोठे वक्तव्य केले आहे. त्याने महाभारतात अभिनय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

आणखी वाचा  - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय

नुकत्याच एका मुलाखतीत सैफ अली खाननं जाहीर केलं की त्याला महाभारतात भुमिका करायला आवडेल, जर मला संधी मिळाली तर मला महाभारतात (Saif Ali Khan Maharabharat) काम करायला आवडेल. मात्र, जर कोणी दिग्दर्शक हा चित्रपट 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' (Lords of the Rings) सारखं बनवतं असेल तर मी त्यात काम करेन अशी अपेक्षाही सैफनं व्यक्त केली आहे. 

सैफ अली खानला त्याच्या ड्रीम रोलबद्दल (Saif Ali Khan Dream Role) विचारलं तेव्हा तो म्हणाला, 'मला तसं वाटत नाही. मी फक्त मला काय ऑफर केलं आहे याचा विचार करतो. खरं सांगायचे तर माझी कोणताही ड्रीम रोल नाही. असा विचार करण्यात काही अर्थ आहे असे मला वाटत नाही. तरीही, मला महाभारतात अभिनय करायला आवडेल, जर कोणी ते 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' सारखे केले तरच मी त्यात काम करेन.'

आणखी वाचा - 'पार्टीत शाहरूख खानच्या तशा वागण्यामुळं आम्हाला रस्त्यावरच...' रितेश देशमुखच्या वक्तव्यावरून एकच खळबळ

रामायणावर आधारित आदिपुरुष (adipurush Teaser) चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चाहते प्रचंड संतापले आहेत. टीझरमध्ये दाखवण्यात आलेला भगवान राम, हनुमान आणि रावण यांचा लूक पाहून सोशल मीडियावर चाहते सतत संताप व्यक्त करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी 12 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.