अमिताभ बच्चनची उडवली खिल्ली, संतापत अभिषेक शोमधून उठून गेला, पाहा VIDEO

नेहमी शांत, संयमी असणार अभिषेक बच्चन शोमध्ये का भडकला? अमिताभ बच्चन यांच्याबद्दल नेमकं काय बोललं गेलं शोमध्ये? VIDEO पाहून संपुर्ण घटनाक्रम समजून घ्या 

Updated: Oct 6, 2022, 02:32 PM IST
 अमिताभ बच्चनची उडवली खिल्ली, संतापत अभिषेक शोमधून उठून गेला, पाहा VIDEO

मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे एक दिग्गज अभिनेते आहेत. या अभिनेत्याचा बॉलिवू़ड इंडस्ट्रीत खुप मोठा आदर केला जातो.अनेक कलाकार देखील त्यांचा आदर करतात. मात्र याच दिग्गज कलाकारावर एका प्रसिद्ध शोमध्ये जोक करण्यात आला. हा जोक त्याच्याच मुलाच्या, म्हणजेच बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) समोर करण्यात आला. हा जोक एकूण अभिषेक बच्चन चांगलाच संतापला आणि तत्काळ शोमधून बाहेर पडला. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. 

रितेश देशमुख (riteish deshmukh), परितोष त्रिपाठी (paritosh tripathi) आणि कुशा कपिला यांच्या 'केस तो बना है'चा (Case Toh Banta Hai) शोमध्ये अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेस्ट म्हणून आला होता. त्याला या शोच्या कोर्टरुममध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात बसवले होते. तर समोरून कॉमेडियन परितोष त्रिपाठी (paritosh tripathi) कॉमेडी करत होता. या दरम्यानच तो परितोषच्या एका जोकवर संतापतो आणि उठून निघून जातो. 

प्रोमोत काय?  

'केस तो बना है'चा (Case Toh Banta Hai) नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) पारा चढताना दिसला आहे. कॉमेडियन परितोष त्रिपाठी (paritosh tripathi) अभिषेकसमोर कॉमेडी करत होता. या दरम्यान तो अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर एक जोक मारतो. हा जोक एकून अभिषेक भडकतो.

संतापत अभिषेक शुटींग थांबवण्याची मागणी करतो आणि म्हणतो, खूप झाले आहे. मला खेळात सामील करा पण माझ्या आई-वडिलांना मध्ये आणणे योग्य नाही. ते माझे वडील आहेत. त्यांना थोडा तरी आदर द्या. यासोबतचं अभिषेक पुढे म्हणतो की, आपण लोकांना थोडा सन्मान दिला पाहिजे.हे सर्व कॉमेडीच्या नावाखाली करू नये. आजकाल काय आहे, भावनेच्या भरात काहीही करतात. मी मूर्ख नाही. एवढं बोलून अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) तिथून उठतो आणि निघून जातो. अभिषेकचा हा संतापलेला प्रोमो आता समोर आला आहे. 

अभिषेक बच्चनने केला प्रँक? 
सोशल मीडियावर हा प्रोमो पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.अनेक जण याला प्रँकही म्हणत आहेत. शोच्या प्रमोशनमध्ये असे अनेकवेळा घडते, जेव्हा एखाद्याचा प्रँक करण्यासाठी अशा घटना घडवून आणल्या जातात. हा प्रोमो पाहून अनेकजण अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) ट्रोल करत आहेत. 

दरम्यान अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो आगामी घूमर चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत सैयमी खेर दिसणार आहे. आर बाल्की हा चित्रपट बनवत आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील या चित्रपटाचा एक भाग असणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागलीय.