आधी माईकनं मारलं, नंतर फोन हिसकावून घेत फेकला'; कॉन्सर्ट सुरु असतानाच आदित्य नारायण चाहत्यावर संतापला

Aditya Narayan : आदित्य नारायणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. स्वत:च्या कॉन्सर्टमध्ये चाहत्यांशी दिलेल्या अशा वागणूकीला पाहता नेटकऱ्यांनी केलं आदित्य नारायणाला ट्रोल

दिक्षा पाटील | Updated: Feb 12, 2024, 03:49 PM IST
आधी माईकनं मारलं, नंतर फोन हिसकावून घेत फेकला'; कॉन्सर्ट सुरु असतानाच आदित्य नारायण चाहत्यावर संतापला title=
(Photo Credit : Social Media)

Aditya Narayan : लोकप्रिय गायक आणि सुत्रसंचालक आदित्य नारायण हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात दिसतो. आता पुन्हा एकदा असं काही झालं आहे की तो चर्चेत आला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आदित्य नारायणचा हा व्हिडीओ एक कॉन्सर्टमधील आहे. या कॉन्सर्टमध्ये एका चाहत्यासोबत आदित्य नारायणनं जशी वागणूक केली त्यावरून त्याला ट्रोल करण्यात आले. 

आदित्य नारायण हा नेहमीच त्याच्या शॉर्ट टेम्पर म्हणजेच रागामुळे चर्चेत राहतो. आदित्य आता पुन्हा एकदा त्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आदित्यचा त्याच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत पाहायला मिळतंय की एक कॉन्सर्ट आहे, ज्यात एक फॅनला मारताना दिसत आहे. इतकंच नाही तर त्यानं त्या चाहत्याचा फोन फेकून दिला. या व्हिडीओमुळे आदित्य नारायण हा पुन्हा एकदा ट्रोल झाला आहे. हा कार्यक्रम छत्तीसगढच्या भिलाई कॉलेडमध्ये सुरु होता. या दरम्यान, आदित्य त्याच्या चाहत्यावर संतापला. दरम्यान, या कॉन्सर्टमध्ये आदित्य हा शाहरुख खानच्या 'डॉन' या चित्रपटातील ‘आज की रात’ हे गाणं गाताना दिसतोय. 

आदित्यचा हा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आदित्य नारायणला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पण सगळ्यांचं लक्ष या गोष्टीनं वेधलं आहे की आदित्यला नक्की कोणत्या गोष्टीचा राग आला. त्यानं फोन का फेकला? तर या व्हिडीओत पाहायला मिळतंय की या कार्यक्रमात असलेले प्रेक्षक हे पाहून आश्चर्यचकीत झाले. इतकंच नाही तर त्यांना मोठा धक्का बसला. ते एकमेकांशी या विषयावर चर्चा करताना दिसत आहेत. 

हेही वाचा : लग्नाच्या 25 वर्षानंतर अरशद वारसीनं केलं कोर्ट मॅरेज!

व्हिडीओ पाहून नेटकरी त्याला ट्रोल करू लागले एक नेटकरी म्हणाला, ‘आदित्य नारायणला काय प्रॉबलम आहे? त्याला कोणत्या गोष्टीचा एवढा माज आहे? आपल्याच चाहत्यांना इतकी वाईट वागणूक. दुसरा नेटकरी म्हणाली, त्याची ही वागणूक, सतत रागवणं. बापरे, त्यानं तर थेट माइकनं त्या व्यक्तीच्या हाथावर मारलं. हे पहिल्यांदा नाही जेव्हा आदित्य नारायण कोणत्या कॉन्ट्रोवर्सीचा शिकार झाला आहे. याच्या आधी देखील तो अनेकदा त्याच्या रागामुळे चर्चेत आला आहे.'