अखेर 11 वर्षांनंतर अभिनेत्रीला कन्यारत्न; हा क्षण डोळ्यात पाणी आणणारा 

 3 एप्रिलला भारती सिंहने एका मुलाला जन्म दिला आहे. 

Updated: Apr 4, 2022, 02:22 PM IST
अखेर 11 वर्षांनंतर अभिनेत्रीला कन्यारत्न; हा क्षण डोळ्यात पाणी आणणारा  title=

मुंबई : अभिनेता गुरमीत चौधरीच्या घराघरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. देबिनाने ३ एप्रिल रोजी एका मुलीला जन्म दिला. खुद्द गुरमीतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर  ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. चाहत्यांना अभिनेत्याचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. 3 एप्रिलला भारती सिंहने एका मुलाला जन्म दिला आहे. यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

देबिनाने दिला मुलीला जन्म
गुरमीत चौधरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तीन हात दिसत आहेत. आधी गुरमीत हात उघडतो, मग देबिना हात उघडते आणि शेवटी एका मुलाचा हात दिसतो. गुरमीत चौधरीने शेअर केलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गुडन्यूज देण्याची गुरमीतची ही स्टाइल चाहत्यांना पसंत पडत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गुरमीत घेत होता देबिनाची काळजी
देबिना तिच्या प्रेग्नेंसीबद्दल खूप उत्साहित होती. तिने तिच्या गरोदरपणाचा प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला होता. देबिनाचे अनेक इंस्टाग्राम रीलही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. प्रेग्नेंसीदरम्यान गुरमीत आणि देबिनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये बेबी बंपमुळे देबिनाला वाकणं आणि सँन्डल घालणं कठीण झालं होतं. अशा परिस्थितीत गुरमीत तिला सँन्डल घालताना दिसला होता. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.