फोटोतील अभिनेत्रीला ओळखलंत का? बॉयफ्रेंडच्या निधनानंतर तिने अख्खी इंडस्ट्री हादरवली...

फोटोत दिसणारी ही मुलगी सध्या खूपच चर्चेत आहे.

Updated: Feb 24, 2022, 03:52 PM IST
फोटोतील अभिनेत्रीला ओळखलंत का? बॉयफ्रेंडच्या निधनानंतर तिने अख्खी इंडस्ट्री हादरवली... title=

मुंबई : सध्या बॉलीवूड सेलिब्रिटींना बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांना ओळखण्याचे आव्हान दिले जात आहे. बॉलीवूड प्रेमी दररोज सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो शेअर करत आहेत, हे फोटो पाहून नेटकऱ्यांना त्यांच्या आवडत्या कलाकरांना ओळखणं कठीण झालं आहे.

नुकताच एका अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो समोर आला आहे. या फोटोत असलेल्या चिमुकलीला ओळखणं कठीण झालं आहे. फोटोत दिसणारी ही मुलगी सध्या खूपच चर्चेत आहे. बिग बॉस 13 मध्ये तिने आपल्या निरागसतेने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते.

तुम्ही तिला ओळखले का? जर नसेल ओळखलं, तर ही मुलगी दुसरी कोणी नसून सगळ्यांची लाडकी शहनाज गिल आहे. शहनाज गिलचा हा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

बिग बॉस 13 मध्ये सहभागी होऊन शहनाज गिलला खूप लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये तिची सिद्धार्थ शुक्लासोबतची जोडी प्रेक्षकांना ही फार आवडली आणि चाहत्यांनी या जोडीचे नाव 'सिधनाज' ठेवले.बिग बॉसनंतर शहनाज काही म्युझिक अल्बममध्येही दिसली होती. एवढेच नाही तर ती पंजाबी चित्रपट 'हौंसला रख'मध्येही दिसली होती.

शहनाज गिलची लोकप्रियता आता इतकी वाढली आहे की, आजच्या काळात तिच्याकडे प्रोजेक्टसच्या रांगा लागल्या आहेत.

पण सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज सर्वात जास्त चर्चेत आली होती. बॉयफ्रेंडच्या जाण्यानंतर ती खूपच तुटली होती. ती अवस्था खूपच वाईट झाली होती.

बिगबॉस 15च्या ग्रॅण्ड फिनालेच्या वेळी  सलमान खान देखील शहनाजला पाहून भावूक झाला होता. बिग बॉसच्या प्रवासात शहनाज ही सलमानची एक फेवरेट स्पर्धक होती. कारण शहनाज नेहमीच आपल्या बबली आणि बिनधास्त अंदाजाने सगळ्यांचं मनोरंजन करत होती.