Vicky Kaushal Mahavatar : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा गेल्या अनेक दिवसांपासून एकामागे एक असे सतत चित्रपट करतोय. त्यातही तो वेगवेगळ्या धाटनीच्या भूमिका करत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. विकीच्या 'छावा' या ऐतिहासिक चित्रपटानंतर जर काही मिसिंग आहे तर ते आहे एक मायथॉलॉजिकल भूमिका. आता त्याच्या चाहत्यांची ती देखील इच्छा पूर्ण झाली आहे. आता विकी एका मायथॉलॉजिकल भूमिकेत दिसणार आहे.
निर्माता दिनेश विजयनं त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यात विकी हा परशुराम या भूमिकेत दिसणार आहे. परशुराम हा विष्णुचा सहावा अवतार आहे. त्याची घोषणा करत त्यांनी एक मोशन पोस्टर शेअर केलं आहे. या चित्रपटाचं नाव 'महावतार' आहे. या चित्रपटाची घोषणा करतानाच्या या अनाउंसनेंट व्हिडीओमध्ये परशुरामच्या भूमिकेत विकी कौशलचा लूक रिव्हिल केला आहे.
विकीच्या पोस्टरसोबत लिहिलं आहे की 'धर्माचे योद्धा, चिरंजीवी परशुरामची गोष्ट'. या चित्रपटाचं मोशन पोस्टर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, काय व्हिजन आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, अप्रतिम, हे अविश्वसनिय आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, आणखी एक चांगली पटकथा आणि ब्लॉकबस्टर चित्रपट. आणखी एक नेटकरी म्हणाला, भावा, आताच तर छावाचा ट्रेलर पाहिला. त्याचीच इतकी उत्सुकता आहे त्यात असं मोशन पोस्टर प्रदर्शित केलं. नक्की काय करण्याचा विचार आहे. पोस्टरमध्ये विकीच्या लूकसोबत प्रदर्शनाच्या तारखेची देखील घोषणा करण्यात आली आहे. 'महावतार' क्रिसमस 2026 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पोस्टमध्ये सांगितलं आहे की या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक असतील त्यांनीच 'स्त्री 2' बनवला होता.
हिंदू मायथॉलोजीमध्ये परशुराम यांना देखील हनुमान आणि अश्वत्थामाप्रमाणे महत्त्व देण्यात आलं. परशुराम यांची गोष्ट रामायण आणि महाभारतातही पाहायला मिळाली. विकी कौशलला त्यांच्याच भूमिकेत पाहण्यासाठी सगळे उत्साही आहेत.
हेही वाचा : 'या' अभिनेत्यामुळे अमिताभ बच्चन यांना मिळायचं कमी मानधन! एका दिवसाच्या शूटिंगसाठी घ्यायचा 35 लाख
दरम्यान, 'महावतार' आणि 'छावा' व्यतिरिक्त विकी कौशलकडे आणखी अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. विकीनं आजवर वेगळ्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. 'डंकी', 'मसान', 'बॅड न्यूज', 'द ग्रेट इंडियन फॅमिली', 'उरी', 'सॅम बहादूर', 'राजी', 'जरा हटके जरा बचके', 'संजू' , 'सरदार उधम सिंह', 'गोविंदा मेरा नाम' सारखे चित्रपट केले आहेत.