मंदिराकडून पतीच्या निधनानंतर घरात हवन

मंदिराला पतीच्या मृत्यूनंतर मोठा धक्का बसला होता.

Updated: Jul 31, 2021, 05:42 PM IST
मंदिराकडून पतीच्या निधनानंतर घरात हवन

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस आयकॉन मंदिरा बेदी पती राज कौशल यांच्या निधनानंतर सतत चर्चेत आहे. 30 जून रोजी मंदिराने आपला पती गमावला, राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. 

मंदिराला पतीच्या मृत्यूनंतर मोठा धक्का बसला होता. पण आता ती आपलं जीवन सामान्य पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करत आहे. राज कौशल यांच्या मृत्यूला एक महिना उलटून गेला आहे. नुकतच मंदिराने तिच्या घरात हवन ठेवलं होते. समोर आलेल्या फोटोंमध्ये ती तिच्या मुलांसोबत पूजा करताना दिसत आहे.

मंदिराकडून पतीनिधनानंतर हवन 

मंदिरा यांनी या हवन पूजा करतानाचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये तिचा मुलगा वीर आणि मुलगी तारासोबत मंदिरा पूजा करत आहे. फोटो शेअर करताना मंदिराने लिहिलंय की, 30 वा दिवस. 

मुलीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

मंदिरा गेल्या एका महिन्यात तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. पण आता तिला तिच्या मुलांसाठी मजबूत व्हायचं आहे.नुकताच मंदिराने मुलगी ताराला घरी येऊन एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला. काही सुंदर आठवणी शेअर करत मंदिराने एक खास पोस्ट शेअर केली होती. "आज एक वर्ष आहे जेव्हा तू आमच्या आयुष्यात आली, प्रिय तारा. माझी मुलगी, तुझा 5 वा वाढदिवस आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते."