मालदीवच्या वातावरणाचा करिना कपूरच्या त्वचेवर परिणाम?

करीना कपूर तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कुटुंबासह मालदीवला गेली होती. 

Updated: Sep 25, 2021, 03:01 PM IST
मालदीवच्या वातावरणाचा करिना कपूरच्या त्वचेवर परिणाम?

मुंबई : करीना कपूर तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कुटुंबासह मालदीवला गेली होती. या दरम्यान, अभिनेत्रीने तिचे बरेच फोटो पोस्ट केले. ज्यांच्यावर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला. अभिनेत्री आता मुंबईत परतली आहे. पण या काळात करीनाचा लूक पूर्णपणे बदलला गेला. तिला पासून अनेकांना धक्का बसला आहे.

करीनामध्ये मोठा बदल
करीना कपूर नुकतीच सुट्टीनंतर मुंबईत परतली आहे. मुंबई विमानतळावर अभिनेत्री तिच्या कुटुंबासह दिसली. करीनाच्या लूकमध्ये खूप बदल झाला. अभिनेत्रीचे संपूर्ण शरीर टॅन्ड झाले आहे आणि तिच्या शरीरावर लाल-लाल डाग दिसत होते. त्याचबरोबर सैफवर टॅनिंगचा फारसा परिणाम दिसून येत नव्हता. 

बर्थडे सेलिब्रेशनची झलक
बुधवारी बेबोने मालदीवमध्ये दणक्यात वाढदिवस साजरा केला. सेलिब्रेशनचे अनेक फोटो देखील शेअर केले. तिने एक फोटो पोस्ट केला होता ज्यात सैफ आणि तैमूर पुढे चालताना दिसतात तर करीना तिच्या लहान बाळाला कुशीत घेऊन मागे चालत आहे.