शाळांपाठोपाठ आता राज्यातील थिएटर्सही होणार सुरु!

थिएटर्स आणि नाट्यगृह सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Sep 25, 2021, 02:53 PM IST
शाळांपाठोपाठ आता राज्यातील थिएटर्सही होणार सुरु!

मुंबई : नुकतंच राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयापाठोपाठ थिएटर्स आणि नाट्यगृह सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. 22 ऑक्टोबरपासून राज्यातील थिएटर्स आणि नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली होती. यावेळी या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पूर्ण पालन करून थिएटर्स सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.