'पद्मावत' पाठोपाठ 'अय्यारी'च्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह ! संरक्षण मंत्रालयाचा आक्षेप

'पद्मावत' सिनेमानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी यांचा आगामी चित्रपट 'अय्यारी' देखील वादामध्ये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Updated: Feb 5, 2018, 10:18 PM IST
'पद्मावत' पाठोपाठ 'अय्यारी'च्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह ! संरक्षण मंत्रालयाचा आक्षेप  title=

मुंबई : 'पद्मावत' सिनेमानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी यांचा आगामी चित्रपट 'अय्यारी' देखील वादामध्ये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

'अय्यारी' च्या काही सीन्सला लागणार कात्री  ? 

अय्यारी या चित्रपटाच्या काही सीन्सवर संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे. काही सीन्स बदलण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. 'अय्यारी' हा चित्रपट 9 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. 

रिलीज आधी बदल करणं कठीण 

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संरक्षण मंत्रालयाने हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी अनेक सीन्सवर आक्षेप नोंदवला आहे. अय्यारी हा सस्पेंस थ्रिलर चित्रपट आहे. वेगवेगळ्या वळणावर या चित्रपटात येणारे प्रसंग अंगावर शहारा आणणारे आहेत. 

चित्रपटाचे प्रदर्शन अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपल्याने त्याता आयत्या वेळेस बदल करणं कठीण होणार आहे. 

सिद्धार्थ कपूर आणि मनोज वाजपेयी खास भूमिकेत 

सिद्धार्थ कपूर आणि मनोज वाजपेयी या दोन सैनिक अधिकार्‍यांच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कहाणी फिरत आहे. चित्रपटात सिद्धार्थ हा मनोजचा शिष्य दाखवण्यात आला आहे. नीरज पांडेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

अय्यारीसोबतच अक्षयकुमारचा पॅडमॅन  हा चित्रपटही रिलीज होणार आहे.