Cyber bot AI: भंडारा जिल्हा पोलीसांनी सायबर गुन्ह्यांना लगाम घालण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरूवात केलीय. सायबर फसवणूक झालेल्या व्यक्तीने व्हॉटसअपवर मॅसेज केल्यास AI उत्तरं देणाराय.. यामुळे सायबर क्राईम रोखण्यास मदत होणाराय. राज्यातील पहिला प्रयोग भंडाऱ्यातून सुरू झालाय.
भंडा-यात सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी AIचा वापर केलाय. पोलिसांनी सायबर बॉट हा प्रोग्राम तयार केलाय. सायबर फसवणुकीची तक्रार असेल त्यांनी एक मेसेज करायचा आहे. मेसेज केल्यानंतर लगेच त्याच्यासमोर काही ऑप्शन दिले जातील. ते निवडल्यानंतर आपोआप सायबर हल्ला झालेल्या व्यक्तीला त्याच्या प्रश्नांची उत्तर मिळत जातील.
आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी मदत होईल. हॅकर्स फेसबुक, व्हाट्सअप अकाउंट हॅक करतात. फसवणुकीचा मेसेज पाठवून बँकेतील पैसे काढून घेतात. या सर्व प्रकाराला आता आळा बसणारेय. राज्यातील हा पहिला प्रयोग भंडाऱ्यात राबवण्यात येतोय..
सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेता भंडारा पोलिसांनी सुरू केलेला AI बॉट हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आणि उपयुक्त आहे.. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त याचा फायदा घ्यावा. आणि सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावं असं आवाहन पोलिसांनी केलंय.