वडिलांच्या निधनानंतरही मंदिराकडे दत्तक मुलीचा जंगी बर्थडे सेलिब्रेशनचा हट्ट

ताराच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त मंदिराने मुलगी तारा आणि राजसोबत काही फोटो शेअर केले आहेत.

Updated: Jul 29, 2021, 06:54 PM IST
वडिलांच्या निधनानंतरही मंदिराकडे दत्तक मुलीचा जंगी बर्थडे सेलिब्रेशनचा हट्ट

मुंबई : पती राज कौशलच्या निधनानंतर अभिनेत्री मंदिरा बेदी आता पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. मंदिराने अलीकडेच आपली मुलगी ताराचा पाचवा बर्थडे सेलिब्रेट केला आहे. या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचं संपूर्ण कुटुंब दिसत आहे.

ताराच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त मंदिराने मुलगी तारा आणि राजसोबत काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्यांचे सुखी कुटुंब दिसत आहे. या फोटोंमध्ये तारा आई मंदिरा, मोठा भाऊ आणि वडील राज यांच्यासोबत दिसत आहे. 

तारा मंदिराची दत्तक घेतलेली मुलगी 

मंदिराने 28 जुलै 2020 ला ताराला दत्तक घेतले होते, आता ती पाच वर्षांची झाली आहे. 

फोटोंसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "28 जुलै! एका वर्षापूर्वी आपण तु आमच्या आयुष्यात आली .. प्रिय तारा, आणि आज आम्ही तुझा वाढदिवस साजरा करीत आहोत. आज तुझा पाचवा वाढदिवस, माझ्या बाळा.. मी तुझ्यावर खूप प्रेम करते."