अटक राज कुंद्राला, मन:स्ताप उमेश कामतला

बुधवारी या मालिकेच शूटिंग करत असतानाच सेटवर उमेशला फोन आणि मेसेजस यायला सुरुवात झाल्याचं त्याने सांगितलं.

Updated: Jul 22, 2021, 04:30 PM IST
अटक राज कुंद्राला, मन:स्ताप उमेश कामतला

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्गा याला पॉर्न फिल्मस बनविण्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. ह्या प्रकरणाने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सध्या एक नाव भलतंच गाजतंय ते म्हणजे मराठमोळा अभिनेता उमेश कामत याचं.

राज कुंद्राचा सहकारी म्हणून उमेश कामतला अटकही झाली आहे. या नावाचा आणि मराठमोळा अभिनेता उमेश कामतचा कुठलाही संबंध नाही. पण काही माध्यमांनी राज कुंद्रा प्रकरणातील बातमी देताना अभिनेता उमेश कामतचा फोटो  वापरला . ज्यांमुळे उमेश कामत खूपच संतापला आहे. उमेशला विनाकारण प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावं लागलं आहे.

सध्या उमेश कामत स्मॉल स्क्रिनवरील "अजून ही बरसात " या मालिकेतून  प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.  बुधवारी या मालिकेच शूटिंग करत असतानाच सेटवर उमेशला फोन आणि मेसेजस यायला सुरुवात झाल्याचं त्याने सांगितलं.  त्यामुळे उमेशला या प्रकाराने खुपच त्रास भोगावा लागला आहे.
 
तसचं माध्यमांनी चुकीचा फोटो वापरत बातम्या दिल्यानंतरही चूक न सुधारता कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त न केल्याची खंत उमेशने पोस्ट शेअर करत बोलून दाखवली आहे.