राज कुंद्राच्या पापांमुळे मैत्रिणींनी ही सोडली Shilpa Shetty ची साथ?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या अभिनयाच्या जोरदार इंडस्ट्रीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 

Updated: Oct 27, 2021, 11:30 AM IST
राज कुंद्राच्या पापांमुळे मैत्रिणींनी ही सोडली Shilpa Shetty ची साथ?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या अभिनयाच्या जोरदार इंडस्ट्रीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अंदाजामुळे ही ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील शिल्पा चांगलीच सक्रिय असते.

पण काही महिन्यांपूर्वी शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रामुळे सतत चर्चेत होती. शिल्पाचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिल्पावर ही खूप आरोप- प्रत्यारोप करण्यात आले. शिल्पाने आपली बाजू ठामपणे मांडत सगळ्यांना प्रत्यूत्तर दिलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकताच करवा चौथ बॉलिवूड अभिनेत्रींनीही साजरा केला. शिल्पा शेट्टी आणि तिच्या इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी मैत्रिणी नेहमी एकत्र करवा चौथचं सेलिब्रेशन करताना दिसतात. पण यंदा शिल्पा काही दिसली नाही. 

पती राज कुंद्राची सुटका झाल्यानंतर अभिनेत्री त्याच्यासोबत कोणताही फोटो शेअर केला नाही.  मैत्रिणींकडून यंदा शिल्पाला आमंत्रण मिळालं नाही, असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे शिल्पा आता बॉलिवूड फक्शनला जाणं टाळत असल्याचं ही बोललं जात आहे.