मुंबई : बॉलिवूड सध्या वेगवेगळया कारणांमुळे चर्चेत आलं आहे. तरीही बॉलिवूडकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. अनेक लोकं दररोज मुंबई या मायानगरीत येत असतात. बॉलिवूडमधील अनेकांना या मायानगरीने सर्वस्व दिलं आहे. मात्र या इंडस्ट्रीच्या आड अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात. (After Raj Kundra, Shah Rukh Khan is in the news because of this man who Posing Himself event manager traffic young girl ) हल्लीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ANI ने दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती मुलींना खोटी माहिती देऊन ट्रॅफिकिंग करत होता. ही व्यक्ती सोशल मीडियावर स्वतःला इव्हेंट मॅनेजर म्हणत असे. मुलींना बॉलिवूडचा किंग खान शाहरूखच्या सिनेमात काम देण्याचं आश्वासन देसत असे. पश्चिम बंगालमधून आणलेल्या 17 वर्षीय मुलीला मुंबईत रेस्क्यू केलं आहे.
GRP has rescued a 17-year-old who was trafficked from Palashipara, West Bengal to Mumbai with promise of providing roles in films with Shah Rukh Khan. The man, who lured the girl by posing as an event manager on social media, has been arrested: Dnyaneshwar Katkar, SI, Dadar GRP pic.twitter.com/zJnGfd6tJg
— ANI (@ANI) July 21, 2021
दादर स्टेशनवर जीआरपीच्या SI द्यानेश्वर कटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,'जीआरपीने 17 वर्षांच्या एका मुलीला रेस्क्यू केलं आहे. ज्या मुलीला शाहरूख खान (Shahrukh Khan) च्या सिनेमात काम देण्याच्या बहाण्याने पश्चिम बंगालहून मुंबईत आणलं आहे. सोशल मीडियावर स्वतःला इव्हेंट मॅनेजर सांगून मुलींना फसवत असे. या व्यक्तीला अटक करण्यात आलंय.'
या अगोदरही अशा गोष्टी समोर आल्या आहेत. लोकप्रिय आणि दिग्गज कलाकारांची नावे सांगून मुलींचं ट्रॅफिकिंग केलं जात असे. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचं नाव घेण्यात आलं. कामाबद्दल बोलायचं झालं तर शाहरूख लवकरच 'पठान' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं पोस्टर अद्याप रिलीज केलेलं नाही.