बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यात आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात मनोज जरांगेदेखील सहभागी झाले होते. दरम्यान या मोर्चादरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने केलेल्या भाषणादरम्यान उपस्थित भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पप्पा तुम्ही जिथे असाल तिथे हसत राहा अशा आर्त हाक यावेळी तिने दिली.
"आमचा आनंद हिरावून घेतला आहे. आम्ही तुमच्या पाठिंब्यामुळे हा लढा पुढे नेत आहोत. आमच्या कुटुंबाच्या पाठिशी राहा. आमच्या पाठीमागे कायम राहा माझ्या वडिलांची छळ करून का हत्या केली," असं सांगताना वैभवी देशमुखला अश्रू अनावर झाले. यावेळी तिने पप्पा तुम्ही जिथे असाल तिथे हसत राहा अशी आर्त हाकही दिली. यानंतर उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही यावेळी भाषण केलं. यावेळी ते म्हणाले की, "जगात सगळं दिसत पण माझा भाऊ मला दिसत नाही. माझ्या भावाचं काय चुकलं, 20 वर्ष सेवा केली हे चुकलं का.? या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा करा. सीआयडीच्या हाती एक व्हाईस सॅपल लागले आहे, ते मॅच झाले आहे. आमच्या कुटुंबाला शेवटपर्यंत साथ द्या. आपल्या भावाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही. गुन्हेगारी मुळासकट उखडून टाकण्याची ही मुख्यमंत्र्यांना संधी आहे".
दरम्यान यावेळी निवेदना वाचताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. "वाल्मिक कराड याच्यावर 302चा गुन्हा दाखल करावा. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करावे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे, या कुटुंबाला 1 कोटींची मदत करावी. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं," असं निवेदन वाचण्यात आलं.
दरम्यान आरोपी विष्णू साठे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीआयडी काय पुढे करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पुरवणी जबाबानुसार खुनाच्या खटल्यामध्ये सीआयडी पुन्हा ताब्यात घेणार का याकडे लक्ष आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता मोर्चाला होणार सुरुवात होणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. बार्शी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मनोज जरांगे आणि बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मयत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी होणार आहेत. सर्व मराठा संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चा सकाळी 11 वाजता सुरू होईल.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
SRH
(20 ov) 219/6
|
VS |
PBKS
223/4(18.5 ov)
|
| Punjab Kings beat Sunrisers Hyderabad by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 201/8
|
VS |
RR
202/4(18 ov)
|
| Rajasthan Royals beat Royal Challengers Bengaluru by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(50 ov) 218/9
|
VS |
NAM
223/9(49.3 ov)
|
| Namibia beat Oman by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.