मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात अडकला. यामुळे त्यांने तुरुंगवास देखील भोगला. अलीकडेच, राज कुंद्रा पत्नी शिल्पा शेट्टीसह हिमाचल प्रदेशातील मंदिरांना भेट देऊन, प्रार्थना करून मुंबईला परतला. यावेळी त्याला एका दुकानाबाहेर स्पॉट करण्यात आलं.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्राला पहिल्यांदाच पापाराझींनी पाहिले आहे. यापूर्वी तो मीडियाच्या कॅमेऱ्यांसोबत लपाछपी खेळताना दिसला होता.
हिमाचलला जाताना आणि येताना तो पत्नी शिल्पा शेट्टीसोबत दिसला नाही. काही दिवसांपूर्वी संपूर्ण कुटुंब अलिबागला सुट्टीवर गेले असताना राज कुंद्रा कुटुंबासोबत दिसला नाही. पण आता राज कुंद्राचा लपंडाव संपला आहे.
तो पापाराझींच्या कॅमेऱ्यापासून स्वत:ला वाचवू शकला नाही. राज यांनी माध्यमांशी चर्चा केली नाही. तो दुकानातून बाहेर पडला आणि त्याच्या गाडीत बसला.
राज कुंद्रा तुरुंगात गेल्यापासून शिल्पा शेट्टीचे आध्यात्मिक रूप सर्वांसमोर आले. पती-पत्नी दोघेही धर्मशाळेतील बगलामुखी मंदिरात गेले. तेथे त्यांनी तांत्रिक पूजा केली. मंदिरातून दोघांचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते.