सलमान खानचा सिनेमा रिलीज, अतिउत्साही चाहत्यांकडून थिएटरमध्येच 'धुमधडाका'

चाहत्यांकडून फटाकेबाजी केली जाते.

Updated: Nov 27, 2021, 07:15 PM IST
सलमान खानचा सिनेमा रिलीज, अतिउत्साही चाहत्यांकडून थिएटरमध्येच 'धुमधडाका'

निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव :  कोरोना काळात सिनेमागृह बंद असल्याने अनेक सिनेमे हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत होते. त्यामुळे प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या मनोरंजनाची सोय केली. त्यानंतर आता नव्या नियमावली अंतर्गत थिएटर प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले आहेत. अनेक हिंदी आणि मराठी सिनेमे प्रदर्शित करण्यात येत आहेत. रिलीज होणाऱ्या सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद ही मिळताना दिसत आहे.

त्यात नुकताच रिलीज झालेला सुर्यवंशी आणि झिम्मा या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. त्या पाठोपाठ आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा अंतिम हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात सलमानचा अॅक्शनपॅक अंदाज पाहायला मिळत आहे. तर महेश मांजरेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

सिनेमा रिलीज होताच सलमान खानच्या चाहत्यांनी याच जंगी सेलिब्रेशन केल्याचं दिसून आलं. मालेगावमध्ये अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांनी चक्क सिनेमागृहात फटाक्यांची आतषबाजी केल्याचा पाहायला मिळालं.

पण अतिउत्साहीपणा समोर आल्याने चित्रपट प्रेक्षकांची एकच धावपळ यावेळी उडाली.मालेगावच्या सुभाष थिएटरमध्ये शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या शो दरम्यान हा प्रकार घडला. अभिनेता सलमान खानचा अंतिम सिनेमा सुरू असतांना सलमानच्या अतिउत्साही चाहत्यांनी चक्क थिएटरमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

दरवर्षी सलमानच्या सिनेमा रिलीज होताच चाहत्यांकडून फटाकेबाजी केली जाते.