अग्गंबाई सूनबाई : सुझेन आणि सोहम प्रेमप्रकरण शुभ्रासमोर

शुभ्रा च्या आयुष्यात येणार एक नवी व्यक्ती

Updated: Apr 28, 2021, 02:44 PM IST
अग्गंबाई सूनबाई : सुझेन आणि सोहम प्रेमप्रकरण शुभ्रासमोर

मुंबई : झी मराठीवरील ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे. ह्या मालिकेत शुभ्राचं रूप खूप वेगळं आहे, ही शुभ्रा थोडी बुजरी आहे, ती एका मुलाची आई आहे, तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर की नाही हा भाव तिच्या मनात सतत असतो. या मालिकेत आसावरीने घराची सूत्र हाती घेतली आहेत सोहम तिचा राईट हॅन्ड आहे, अभिजीत राजेंनी घरची जबाबदारी स्वीकारली आहे.

दोघांमध्ये बाबा आणि मुलीचं नातं आहे. बबडूची (मुलाची) पूर्ण जबाबदारी असल्याने ती घरातच आहे, ती अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे, शुभ्रा अशी आहे कारण मुलाच्या म्हणजेच बबडूच्या जन्माच्यावेळेस निर्माण झालेली गुंतागुंत आणि सोहम सोबत संसार टिकवण्यासाठीची तिची धडपड.

आता शुभ्रा ला आणखी एक धक्का बसणार आहे, कारण सोहम आणि सुझेन चं प्रेमप्रकरण तिच्या समोर येणार आहे. शुभ्रा हा धक्का पचवू शकेल? आसावरी आणि अभिजित सुनेच्या बाजूने उभे राहणार आहेत हे नक्की. मनाने खचलेल्या शुभ्रा च्या आयुष्यात येणारी नवीन व्यक्ती कोण असेल? पाहायला विसरू नका ‘अग्गबाई सूनबाई’ सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.