Allu Arjun Tests Positive : तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुन कोरोनाच्या विळख्यात, फोटो शेअर करत म्हणाला...

बॉलिवूडसोबत तेलुगु इंडस्ट्रीत शिरला कोरोना

Updated: Apr 28, 2021, 12:22 PM IST
Allu Arjun Tests Positive : तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुन कोरोनाच्या विळख्यात, फोटो शेअर करत म्हणाला...

मुंबई : तेलुगु अभिनेता अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वतः अल्लू अर्जूनने दिली आहे. त्याने स्वतः आपल्या ऑफिशिअल अकाऊंटवर आपण क्वारंटाईन असल्याची माहिती दिली आहे. चाहत्यांना हा खूप मोठा धक्का आहे. (Allu Arjun Tests Positive for Coronavirus)

अल्लू अर्जुनने ट्विट करत म्हटलंय की,'सगळ्यांना नमस्कार! माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. मी त्या सगळ्यांना विनंती करतो जे माझ्या संपर्कात आले आहे. त्यांनी आपली काळजी घ्यावी. चाचणी देखील करून घ्या. मी सगळ्या शुभचिंतकांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, घरी राहा सुरक्षित राहा.'

अल्लू अर्जुन ही पोस्ट शेअर करताच अगदी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. त्याच्या चाहत्यांना आणि कुटुंब, मित्र मैत्रिणींनी त्याला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अल्लू अर्जुनने 2003 साली 'गंगोत्री' सिनेमातून डेब्यू केलं आहे. अल्लूला फिल्मफेअर आणि नंदी अवॉर्ड देखील जाहीर झाला आहे. आतापर्यंत त्याने अनेक हिट सिनेमे दिले आहे. अल्लूचं लग्न स्नेहा रेड्डी सोबत 6 मार्च 2011 साली झालं. या दोघांना एक मुलगा आणि मुलगी आहे.