'बॉर्डर 2'मध्ये सुनील शेट्टीच्या जागी 'या' अभिनेत्याची एन्ट्री, सनी देओलने केली घोषणा

27 वर्षांनंतर 'बॉर्डर' चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्यानंतर या चित्रपटात आणखी एका सैनिकाने प्रवेश घेतला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 3, 2024, 04:01 PM IST
'बॉर्डर 2'मध्ये सुनील शेट्टीच्या जागी 'या' अभिनेत्याची एन्ट्री, सनी देओलने केली घोषणा

Border 2 : 1997 मध्ये प्रदर्शित झालेला 'बॉर्डर' हा चित्रपट त्या काळातील सर्वात हिट चित्रपट होता. बॉक्स ऑफिसवर तो सर्वकालीन ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणून घोषित झाला होता. या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, पुनीत इस्सार, सुदेश बेरी, कुलभूषण खरबंदा आणि इतर अनेक कलाकार दिसले होते. 

Add Zee News as a Preferred Source

'बॉर्डर' चित्रपटाच्या यशानंतर जेपी दत्ता यांनी 'बॉर्डर 2' चित्रपटाची घोषणा केली होती. आता 27 वर्षांनंतर अनुराग सिंग दिग्दर्शित 'बॉर्डर 2' मोठ्या पडद्यावर परतत आहे. 

'बॉर्डर 2' मध्ये या कलाकारांचा समावेश

सनी देओल पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना सैनिकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी समोर येत होती. मात्र, या बातमीत तथ्य नव्हते. यानंतर सनी देओलने अधिकृतपणे घोषणा केली की वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ या चित्रपटाचा भाग असतील. 

आता या चित्रपटात चौथा शिपाई दाखल झाला आहे. 'बॉर्डर' चित्रपटात सुनील शेट्टीने भैरव सिंहची भूमिका साकारली होती. आता 'बॉर्डर 2'मध्ये त्याच्या जागी अहान शेट्टी दिसणार आहे. सनी देओलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटाची अधिकृत माहिती शेअर केली आहे. 

या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित 

'बॉर्डर 2' हा चित्रपट 2026 मध्ये 23 जानेवारीला रिलीज होणार आहे. जेपी दत्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत नाहीत तर त्यांची मुलगी निधी दत्ता या चित्रपटाची निर्माती आहे. यावेळी देखील चित्रपटाची कथा किंवा त्याचा काही भाग भारत आणि पाकिस्तानमधील परस्पर युद्धावर आधारित असू शकतो.

सध्या सोशल मीडियावर चाहत्यांना देखील या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. कारण 'बॉर्डर' हा चित्रपट प्रचंड हिट ठरला होता. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More