मुंबई : साऊथ सिनेमांमध्ये सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनुषची पत्नीआणि तामिळ सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतचा आज वाढदिवस. आपल्या वडिलांप्रमाणे आणि नवऱ्याप्रमाणे ऐश्वर्या अभिनयात नाही तर दिग्दर्शनात आपली कमाल दाखवत आहे. तसेच अनेक टीव्ही शोमध्ये परिक्षक म्हणून जाते. ऐश्वर्याच्या जन्मदिवशी जाणून घेऊया तिची आणि धनुषची लव्हस्टोरी
साधारण दिसणारा धनुष खऱ्या आयुष्यात प्रेमाकरता फ्रंटफुटवर खेळला आहे. धनुषने 2004 साली ऐश्वर्या रजनीकांतसोबत लग्न केलं. या दोघांची भेट एका कार्यक्रमात झाली होती. 'काढाल कोंडे' या सिनेमाच्या पहिल्या शोकरता धनुष संपूर्ण कुटुंबासोबत गेला होता. तेव्हा सिनेमा संपल्यावर माझी आणि रजनीकांत यांच्या दोन्ही मुलींशी भेट झाली. एकमेकांना हस्तांदोलन करून आम्ही निघून गेलो.
दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने धनुषला एक पुष्पगुच्छ आणि गुड वर्कचं कार्ड पाठवलं. या गोष्टीला धनुषने मनाला लावून घेतली. ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षाने मोठी आहे. दोन वर्ष डेट केल्यावर या दोघांनी लग्न केलं.
धनुषची बहिण ऐश्वर्याची चांगली मैत्रिण आहे. दोघांच्या भेटींवर मीडियात भरपूर चर्चा होत असे. त्यामुळे कुटुंबियांनी या दोघांच लग्न करून देण्याच निर्णय घेतला. लग्न झालं तेव्हा धनुष 21 वर्षांचा होता तर ऐश्वर्या 23 वर्षांची. धनुषने आपण 23 वर्षांच्या आतच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 18 नोव्हेंबर रोजी या दोघांनी लग्न केलं. अतिशय साधेपद्धतीने तामिळ रितीनुसार दोघं लग्नबंधनात अडकले.