फन्ने खानची रीलिज डेट बदलली

ऐश्वर्या राय बच्चन, राजकुमार राव आणि अनिल कपूर यांचा ' फन्ने खान  चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनला होता. 

Updated: Feb 27, 2018, 11:33 PM IST
फन्ने खानची रीलिज डेट बदलली  title=

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन, राजकुमार राव आणि अनिल कपूर यांचा ' फन्ने खान  चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनला होता. 

अनेक दिवसांनंतर अनिल कपूर आणि ऐशवर्या राय ही जोडी एकत्र दिसणार आहे. तसेच या चित्रपटाच्या रिलीज डेटमुळे हा सिनेमा चर्चेचा विषय बनला होता. 

रिलीज डेट काय ? 

'फन्ने खान' हा चित्रपट 2018 सालच्या ईददिवशी रिलीज होणार होता. या दिवशी सलमान खानचा 'रेस 3' चित्रपटदेखील रिलीज होणार असल्याने पुन्हा सलामान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन आमने सामने येणार आहे. 

ट्विटरद्वारा नवी माहिती  

'फन्ने खान' चित्रपटाचे निर्माते क्रिअर्ज एन्टरटेनमेंटद्वारा नुकतेच एक ट्विट करण्यात आले आहे. आता हा चित्रपट 13 जुलै रोजी रीलिज करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी केले आहे. 

 

ऑस्कर विजेत्या चित्रपटावर आधारित  

‘एव्रीबडी इज फेमस’या ऑस्कर नॉमिनेटेड चित्रपटावर  हा सिनेमा आधारित आहे. हा चित्रपट 2000 साली रिलीज झाला होता.