अजय देवगणच्या मुलीमुळे कुटुंबाची बदनामी, अभिनेत्याचा मोठा निर्णय

बॉलिवूड स्टार अजय देवगणला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.

Updated: Sep 30, 2021, 02:20 PM IST
 अजय देवगणच्या मुलीमुळे कुटुंबाची बदनामी, अभिनेत्याचा मोठा निर्णय title=

मुंबई : बॉलिवूड स्टार अजय देवगणला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.अजय देवगणने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि याच कारणामुळे त्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. दुसरीकडे, त्याची पत्नी काजोलबद्दल बोलायचं झालं, तर तिने बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे. काजोल बॉलिवूडची एक अतिशय सुंदर अभिनेत्री मानली जाते आणि ती तिच्या सौंदर्यासाठी तसेच तिच्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते.

काजोल आणि अजय देवगण यांनी 1999 मध्ये लग्न केले. या दोघांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांना बॉलिवूडमधील सर्वात पावरफुल कपल मानले जाते. ही जोडी बऱ्याचदा सोशल मीडियावरही चर्चेत असते, पण आता फक्त अजय देवगण आणि काजोलच नाही तर त्यांची मुलगी न्यासा देखील सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्षवेधून घेताना दिसते. आजकाल सोशल मीडियावर न्यासाची अनेकदा चर्चा होते.

खरं तर, न्यासा बऱ्याचदा तिचे कृत्य आणि ड्रेसिंग सेन्समुळे सोशल मीडियावर ट्रोल होते. न्यासा बऱ्याचदा बोल्ड लूकमध्ये दिसते, ज्यामुळे तिला ट्रोलिंगला बळी पडावे लागते. अजय देवगण देखील अनेक वेळा या ट्रोलर्सवर भडकला आहे. खरं तर, एकदा न्यासा तिचे वडील अजय देवगणसोबत मंदिरात गेली होती, त्या दरम्यान तिने असे क्रॉप टॉप आणि ब्लू पॅन्ट असा जीम लूक केला होता. यावरुन काही लोकांनी तिच्यावर आक्षेप घेतला, त्यावर अजय देवगण खूप रागावला.

यापूर्वीही न्यासा तिच्या कपड्यांमुळे अनेक वेळा ट्रोलिंगचा शिकार झाली आहे. सध्या ती परदेशात शिक्षण घेत आहे, पण तिचे बोल्ड दिसणारे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x