Ajay Devgan ची लेक मैत्रिणीच्या लग्नात 'या' खास व्यक्तीसोबत दिसली; फोटो पाहून चाहते हैराण

अभिनेत्री न्यासा देवगन सध्या लंडनमध्ये आहे

Updated: Sep 29, 2022, 03:49 PM IST
Ajay Devgan ची लेक मैत्रिणीच्या लग्नात 'या' खास व्यक्तीसोबत दिसली; फोटो पाहून चाहते हैराण title=

मुंबई : अभिनेत्री न्यासा देवगन सध्या लंडनमध्ये आहे आणि त्यामुळेच ती कनिका कपूरच्या रिसेप्शन पार्टीत हॉट लूकमध्ये पोहोचली होती. तिने आपल्या मित्रांसोबत या पार्टीत  पिंक कलरच्या ड्रेसमध्ये हजेरी लावली.  बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा देवगण तिच्या हॉट लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

हसीनाची स्टाईल इतकी जबरदस्त आहे की, तरुण मुली तिला सहज फॉलो करू करतात. एवढ्या लहान वयात तिने स्वतःची अशी स्टाईल तयार केली आहे की, सगळे तिच्याकडे बघतच राहतात. वास्तविक, कनिका कपूरने लंडनमध्ये लग्नानंतर रिसेप्शन पार्टी ठेवली होती. ज्यामध्ये अजय देवगणची मुलगी न्यासा देवगन तिच्या मैत्रिणींसोबत हॉट बेबच्या रुपात पोहोचली होती.

लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये झालेल्या या पार्टीत न्यासा गुलाबी रंगाच्या बॉडीकॉनच्या ड्रेसमध्ये आली आणि सर्वजण तिचा ग्लॅमरस अवतार पाहतच राहिले. हसीन बालाचा मित्र ओरहानने तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा लूक खूपच आकर्षक दिसत आहे. ओरहान न्यासाचा खास मित्र आहे.

बॉडीकॉन ड्रेसमध्ये पोज देताना, न्यासाने या पार्टीसाठी निवडलेला बॉडी-हगिंग ड्रेस, तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये तिचा क्लीवेज भाग हायलाइट केला जात होता. ज्यामुळे ती खूपच हॉट दिसत होती. हेच कारण आहे की, तिचा लूक जरी दिसायला साधा असला तरी बोल्डनेसच्या बाबतीत तिने सगळ्यांना मागे सोडलं आहे.

तिच्या पायात  गुलाबी रंगाची हील्स होती आणि तिच्या हातात पांढर्‍या रंगाची मिनी टोट बॅग होती. या लूकला पुर्ण करण्यासाठी न्यासाने कमीतकमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.यावेळी कनिकाचा लूकही खूप ग्लॅमरस दिसत होता डेवी फाउंडेशन, पीच शेड्सचं लिपस्टीक, आणि मोकळे सोडलेले केस. नवीन नवरी कनिका कपूरच्या लूकबद्दल बोलायचे तर ती रेड कलरच्या आउटफिटमध्ये खूपच क्यूट दिसत होती.