Swara Bhaskar on Husband Fahad Ahmad's Defeat : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुती सरकारचा विजय झाला. 288 जागांसाठी ही निवडणूक होती तर 217 ठिकाणी महायुती सरकारनं विजय मिळवला आहे. यामुळेच महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. तर या सगळ्या निकालानंतर ईव्हीएमला घेऊन प्रश्न विचारण्यात आला आहे. सुरुवातीला संजय राऊत यांनी निकाल पाहता गडबड असल्याचं सांगितलं तर आता अभिनेत्री स्वरा भास्करनं ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला आहे.
स्वरा भास्कर चिडण्याचं कारण अणुशक्ति नगरमधून विधानसभा निवडणूकीसाठी तिचे पती फहाद अहमद हा निवडणूक लढत होता. तिचे पती फहाद अहमद हे शरद पवार यांच्या एनसीपीकडून ही निवडणूक लढत होते. फहाद अहमद यांच्या विरुद्ध अजित पवार गटाच्या आणि नवाब मलिक यांची लेक सना मलिक या लढत होत्या. यंदाच्या निवडणूकीत सना मलिक यांनी बाजी मारली आणि आपल्या नवऱ्याचा पराभव पाहता स्वरानं ईव्हीएम मशिनवर प्रश्न उपस्थित केला आहे.
After round 16 and a steady lead in all rounds.. EVM machines that were 99% charged were opened and BJP supported NCP Ajit Pawar candidate took a lead .. @ECISVEEP @SpokespersonECI this is rank manipulation. We demand a recount of rounds 16, 17, 18 and 19. pic.twitter.com/Z2JuUyIQqc
— Fahad Ahmad (@FahadZirarAhmad) November 23, 2024
स्वरा भास्करनं ट्वीट करत सांगितलं की संपूर्ण दिवस निवडणूक होत असली तरी EVM मशीन 99% कशी चार्ज असू शकते? इलेक्शन कमीशन उत्तर द्या... अणुशक्ति नगर विधानसभेत 17,18,19 फेजपर्यंत फराह अहमद पुढे होते आणि अचानक जेव्हा 99% चार्ज मशीन सुरु झाली आणि त्याचे भाजपासोबत एनसीपीची मत कसे मिळू लागले? हे कसं शक्य आहे?
या आधी संजय राऊत यांनी देखील या निकालावर संशय असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं नसू शकतं. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला ओळखतो. हा जनतेचा निर्णय आहे. राऊतांनी म्हटलं की 'एकनाथ शिंदे यांनी आधीच हे म्हटलं होतं की आमच्या एकही उमेदवाराचा पराभव होणार नाही आणि आता निकाल आलाय तर तसं दिसतंय. हे कसं शक्य आहे.'
अणुशक्ति नगरमध्ये फहाद अहमद यांचा पराभव करणारी सना मलिक दिग्ग्ज नेता आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी आहे. फहाद यांचा 3378 मतांनी पराभव झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, पहिले ते या मतदारसंघासाठी समाजवादी पार्टीकडून लढणार होते. पण त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून ते यावेळी लढले.