अजय देवगणच्या 'दृश्यम 2' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; कामाईचा आकडा ऐकून थक्क व्हाल

अजय देवगणचा 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस करत आहे. 

Updated: Dec 5, 2022, 09:57 PM IST
अजय देवगणच्या 'दृश्यम 2' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; कामाईचा आकडा ऐकून थक्क व्हाल title=

मुंबई : बॉक्स ऑफिसवर (Box Office) बॉलिवूडचे अनेक चित्रपट फार काही चाललेले दिसले नाहीत. उलट या चित्रपटांना साऊथच्या चित्रपटांनी चांगलीच कमाई केलेली दिसली. (Drishyam 2 Full Movie) मात्र नुकताच प्रदर्शित झालेला दृश्यम 2 हा (Drishyam 2 Box Office Collection) चित्रपट मोठा गल्ला जमावणार असल्याचं दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच कमी दिवसात मोठ्या आकड्यांना मागे टाकताना दिसत आहे.

अजय देवगणचा 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होवून 17 दिवस पूर्ण झाले आहेत आणि इतके दिवस झाले तरी त्याचा वेग कमी झालेला नाही. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा गाठण्याच्या दिशेने चित्रपटाची वाटचाल खूप वेगाने सुरू आहे. दृष्यम 2 च्या तिसर्‍या रविवारीही कमाईत मोठी झेप घेतली आहे. वरुण धवनचा 'भेडिया' आणि त्यानंतर रिलीज झालेला आयुष्मान खुरानाचा 'अॅन अॅक्शन हिरो' 'दृश्यम 2' समोर फ्लॉप होत असल्याचं दिसत आहे.

'दृश्यम 2' ने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवलं
पहिल्या दिवशी 15.38 कोटींची ओपनिंग करणारा 'दृश्यम 2' जगभरात 200 कोटी कमाईच्या जवळ पोहोचला आहे. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा 'दृश्यम 2' लांब रेसचा घोडा ठरत आहे. रविवारीही चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये जबरदस्त उडी नोंदवण्यात आली आहे. वृत्तानुसार, 'दृश्यम 2' ने 17व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी 10.20 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

जगभरात अनेक कोटींची कमाई केली
जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने 265.35 कोटींची कमाई केली आहे. केवळ परदेशी बाजारपेठेत या चित्रपटाने 5.17 मिलीयन म्हणजेच 42.15 कोटींची कमाई केली आहे. तर त्याचवेळी या चित्रपटाने देशभरात जवळपास 186.58 कोटींची कमाई केली आहे. येत्या आठवडाभरात हा सिनेमा 200 कोटींचा आकडा पार करेल अशी अपेक्षा आहे. 'दृश्यम 2' आपल्या तिसर्‍या आठवड्यात दाखल झाला आहे आणि अशा परिस्थितीत हा सिनेमा आगामी काळात इतर चित्रपटांसाठी अडचणी निर्माण करू शकतो.