Health Tips : तुपासोबत 'या' गोष्टी कधीही खाऊ नका! तुमच्या आरोग्याचे होईल नुकसान

Health Tips : तूप हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वैदात तूप महत्त्वाचं आहे. पण काही गोष्टी अशा आहेत, ज्याचा सोबत तूपाचं सेवन केल्यास आपल्या आरोग्याचे नुकसान होतं. 

नेहा चौधरी | Updated: Dec 27, 2024, 05:00 PM IST
Health Tips : तुपासोबत 'या' गोष्टी कधीही खाऊ नका! तुमच्या आरोग्याचे होईल नुकसान  title=

Health Tips : तूप हे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानलं जातं. सेलिब्रिटीपासून सर्व आहार तज्ज्ञ तुपाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. तुपाच्या सेवनामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे भारतात तर सर्वजण आपल्या आहारात नक्कीच तुपाचा वापर करतात. तूप हे अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असून अन्नाची चवही वाढतो. पण तुपाचे सेवन चुकीच्या पदार्थांसोबत केल्यास त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुपाचा वापर करणारे आणि तुपाचं सेवन करणाऱ्या प्रत्येकाला याची माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात तूप कशासोबत खाऊ नयेत. 

चहा

तूप मिसळलेला चहा कधीही सेवन करू नये. जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी एकत्र सेवन करता तेव्हा त्याचा तुमच्या पचनक्रियेवर खूप वाईट परिणाम होतो. जेव्हा तुम्ही दोन्ही गोष्टी एकत्र सेवन करता तेव्हा तुम्हाला ॲसिडिटीसारख्या समस्यांना सामोरे जावं लागतं. 

मध

आयुर्वेदात तूपात मध मिसळण्यास मनाई आहे. या दोन्ही गोष्टींचं स्वरूप एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. जेव्हा तुम्ही या वेगवेगळ्या निसर्गाच्या गोष्टी एकत्र सेवन करता तेव्हा तुमच्या पोटात रासायनिक प्रतिक्रिया होऊ लागतात. कधीकधी यामुळे तुम्हाला पचनाशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावं लागतं.

मासे

तुपासोबत मासे खाऊ नयेत, असं तज्ज्ञ सांगतात. जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी एकत्र सेवन करता तेव्हा त्याचा तुमच्या पचनक्रियेवर खूप वाईट परिणाम होतो. बऱ्याच वेळा या दोन्ही गोष्टींचे एकत्र सेवन केल्याने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि त्यासोबत शरीरात हानिकारक टॉक्सिन्सही तयार होऊ लागतात.

लिंबूवर्गीय फळं

तुपासोबत आंबट फळांचे सेवन कधीही करू नये. जेव्हा तुम्ही आंबट फळे तुपासोबत खातात, तेव्हा तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या तर होतातच पण गॅस आणि फुगण्याची समस्याही होऊ शकते. आपलं शरीर फळे लवकर पचवण्यास सक्षम असते, तर तूप पचायला जास्त वेळ लागतो.

दही

तूप आणि दही एकत्र खाण्यास मनाई आहे. या दोघांचा स्वभावही एकमेकांपासून वेगळा असल्यामुळे त्यांना एकत्र खाण्यास मनाई आहे. जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी एकत्र खातात तेव्हा तुम्हाला त्या पचायला खूप त्रास होतो.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x