काजोल-अजयच्या लेकीचा चेहरा बदलला? दिवाळी पार्टीत एकच चर्चा; नेटकरी म्हणाले...

न्यासाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Updated: Oct 24, 2022, 04:11 PM IST
काजोल-अजयच्या लेकीचा चेहरा बदलला? दिवाळी पार्टीत एकच चर्चा; नेटकरी म्हणाले...  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोलची लाडकी लेक न्यासा ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. न्यासा ही रविवारी रात्री दिवाळी पार्टीत दिसली आणि तिला ओळखणे कठीण झाले. नुकतीच दिवाळी पार्टीत न्यासा प्रिंटेड ग्रीन कलरच्या लेहेंग्यात दिसली. न्यासा एका मित्रासोबत कारमध्ये दिसली. दरम्यान, यावेळी नेटकऱ्यांना तिला ओळखताच आले नाही.  

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये न्यासा खूपच सुंदर दिसत आहे. न्यासा जवळ उभ्या असलेल्या कॅमेरामॅन पासून दूर जाताना दिसली. व्हिडिओमध्ये ती तिच्या मैत्रिणीसोबत चर्चा करत असल्याचे दिसत आहे. मात्र, नेटकऱ्यांनी यावेळी न्यासाला ट्रोल केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

न्यासाचा हा लूक पाहून काही नेटकरी वारंवार म्हणत आहेत की तिने तिच्या चेहऱ्यावर काहीतरी केले आहे. न्यासानं नाकावर शस्त्रक्रिया केल्याचे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. लोक असं म्हणताना दिसतात की न्यासा जान्हवीसारखी का दिसतेय, तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे का?

या फोटो आणि व्हिडीओमध्ये न्यासा पूर्णपणे बदललेली दिसत आहे. नुकतीच जेव्हा न्यासा भूमी पेडणेकरच्या पार्टीत पोहोचली, तेव्हाही तिच्या जबरदस्त स्टाइलचे खूप कौतुक झाले. न्यासा अनेकदा सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. कधी मित्रांसोबत पार्टी करताना तर कधी मित्रांसोबत फिरायला जाताना फोटो पोस्ट करते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x