'गोलमाल अगेन'चं रेकॉर्ड, खान मंडळींना अजय देवगनचा धोबीपछाड

अजय देवगणचा चित्रपट गोलमाल अगेननं दोन आठवड्यांमध्ये 200 कोटींची कमाई केली आहे.

Updated: Oct 30, 2017, 06:41 PM IST
'गोलमाल अगेन'चं रेकॉर्ड, खान मंडळींना अजय देवगनचा धोबीपछाड title=

मुंबई : अजय देवगणचा चित्रपट गोलमाल अगेननं दोन आठवड्यांमध्ये 200 कोटींची कमाई केली आहे. याचबरोबर गोलमाल यंदाच्या वर्षातला सगळ्यात जास्त कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. यंदा सलामान खान,आमिर खान, शाहरुख या तिघांनाही पिछाडीवर टाकत अजय देवगणने नवा विक्रम  केला आहे. 2017मध्ये बाहुबलीनं 511.30 कोटींची कमाई केली होती. गोलमाल अगेननं पहिल्याच दिवशी जवळपास 32 कोटी रुपयांची कमाई केली होती.

फक्त भारतामध्ये गोलमाल अगेननं 167.52 कोटी रुपयांची तर भारताबाहेर 37.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच आत्तापर्यंत गोलमाल अगेननं 205.12 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

गोलमाल अगेन अजय देवगणचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. २० ऑक्टोबर रोजी 'गोलमाल अगेन' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आला. यामध्ये अजय देवगण, तब्बू, अर्शद वारसी, परिणीती चोप्रा, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आहेत.

2017मध्ये सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट

बाहुबली- 511.30 कोटी रुपये

गोलमाल अगेन- 167.5* कोटी

जुडवा 2- 138 कोटी रुपये

रईस- 137.51 कोटी रुपये

टॉयलेट : एक प्रेम कथा- 134.25 कोटी रुपये

काबील- 126.85 कोटी रुपये

ट्यूबलाईट- 121.25 कोटी रुपये

लॉली एलएलबी 2- 117 कोटी रुपये

बद्रीनाथ की दुल्हनिया- 116.60 कोटी रुपये

बादशाहो- 78.02 कोटी रुपये