कतरिना आणि अक्षय कुमारचं जोरदार भांडण, व्हिडिओ समोर

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. 

Updated: Sep 25, 2021, 06:29 PM IST
कतरिना आणि अक्षय कुमारचं जोरदार भांडण, व्हिडिओ समोर title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो रोज त्याच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करतो. अभिनेता सहसा त्याच्या सह कलाकारांसोबत मजा करताना दिसतो. एकदा त्याने कतरिनाची मस्करी केली आणि यानंतर अभिनेत्रीने त्याला झाडूने मारायला सुरुवात केली.

कतरिनाने केली मारहाण 
कतरिना कैफ आणि अक्षय कुमारचा अॅक्शन चित्रपट 'सूर्यवंशी' बऱ्याच काळापासून प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. कोरोनामुळे, देशभरातील चित्रपटगृहे पूर्णपणे उघडलेली नाहीत. रोहित शेट्टीने 'सूर्यवंशी' देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'सूर्यवंशी' सिनेमाचं शूटिंग चालू असताना सेटवर खूप मजा करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा असाच एक व्हिडिओ आहे. जो व्हिडिओ खूपच मजेदार आहे. यामध्ये कतरिना कैफनेही अक्षय कुमारला झाडूने मारहाण करतेय.

अक्षयचा प्रश्न पडला भारी 
या व्हिडिओमध्ये कतरिना कैफ पांढरा सूट परिधान केला आहे आणि अक्षय कुमार तिला प्रश्न विचारतो की, कॅतरिना तू हे काय करत आहेस? कतरिना कैफ उत्तर देत म्हणते, 'मी साफसफाई करत आहे.' त्यानंतर कतरिना कैफने अक्षयला झाडूने मारायला सुरुवात करते. यावर अक्षय म्हणतो, 'तू मला का मारतेयस?' अशाप्रकारे, हा मजेदार व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे.