मुंबई : नॅशनल पुरस्कार विजेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाचा दिग्दर्शक राघव लॉरेंस (Raghava Lawrence) यांनी एकत्र येत चेन्नईमधील तृतियपंथींसाठी घरं साकारण्याचा विडा हाती घेतला आहे. या कामासाठी अक्षयने दीड कोटी रूपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षयच्या या कामामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिवाय 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाच्या दिग्दर्शकाने देखील त्याचे आभार मानले आहे.
चेन्नईमध्ये फक्त तृतियपंथींसाठी तयार होणारी ही पहिली इमारत असणार आहे. राघवने फेसबुकच्या माध्यमातून ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. 'आमच्या दोघांमध्ये जो विश्वास आहे त्याला आता १५ वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यासाठी आम्ही अत्यंत आनंदी आहोत. त्यामुळे हे वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तृतियपंथींना राहण्यासाठी घर देणं त्यामुळे त्यांचा विकास होईल.'
राघव आणि अक्षयच्या या महत्त्वपूर्व निर्णयाचा फायदा चेन्नईमधील तृतियपंथींना होणार आहे. शिवाय तृतियपंथींसाठी घरं तयार करण्यासाठी निधी जमा करत आहोत. अशात अक्षयने दिलेल्या दीड कोटी रूपयांमधून तृतियपंथींसाठी घरं साकारण्याच्या कामाला सुरूवात करत असल्याचे देखील राघवने सांगितले.
अक्षय कुमार स्टारर 'लक्ष्मी बॉम्ब' लवकरच रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. चित्रपटात तो तृतियपंथीच्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कंचना' चित्रपटा 'लक्ष्मी बॉम्ब' रिमेक असणार आहे. चित्रपटात अक्षय शिवाय कियारा आडवाणी, तुषार कपूर आणि शबीना खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.