...म्हणून अक्षयला साडीमध्ये सहज वाटतं

चित्रपटात अक्षय मध्यवर्ती भूमिकेत आहे.

Updated: Jan 3, 2020, 09:27 PM IST
...म्हणून अक्षयला साडीमध्ये सहज वाटतं

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार सध्या चांगलाच चर्चेत आहे तो म्हणजे 'लक्ष्मीबॉम्ब' या चित्रपटामुळे. आपल्या सवयीच्या वर्तुळातून बाहेर पडत कायमच प्रयोगशीलतेच्या वाटेवर चालणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता अक्षय कुमार याच्या नावाचा उल्लेख केला जातो. आता देखील 'लक्ष्मीबॉम्ब' चित्रपटात त्याने एका ट्रान्सजेंडरची भूमिका बजावत आहे. 

दरम्यान, डीएनएला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने एक मोठा खुलासा केला आहे. 'मला साडीमध्ये सहज आणि सोपं वाटतं.' असं वक्तव्य त्याने केलं आहे. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. अक्षय नेहमीच नव-नव्या भूमिकांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येतो. आता ही ट्रान्सजेंडरची भूमिका देखील त्याच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. 

'साडीमध्ये चित्रीकरण करण्यात मला काही अवघड वाटले नाही. मला प्रत्येत कठीण गोष्टींचा सामना करायला आवडतं. आतापर्यंत साकारलेल्या सर्वात कठीण भूमिकांपैकी ही एक भूमिका असल्याचं अक्षयने यावेळेस सांगितले.
 
लाल रंगाची साडी नेसलेल्या खिलाडी कुमारची नजर कोणा एका गोष्टीवर रोखलेली आहे. त्याच्या मागे एक अष्टभूजा देवी दिसत आहे, जिने असुराचा वध केला आहे. देवीचं हे रुप आणि तिच्या पुढे असणारा अक्षय असा एकंदर फोटो सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. 

राघव लॉरेन्स दिग्दर्शित या चित्रपटात खिलाडी कुमारसोबतस अभिनेत्री किआरा अडवाणीसुद्धा स्क्रीन शेअर करणार आहे. तामिळ चित्रपट 'कांचना'चा रिमेक असणाऱ्या या चित्रपटात अक्षय मध्यवर्ती भूमिकेत आहे. ज्याला एका तृतीयपंथी व्यक्तीच्या आत्म्याने झपाटलेलं असतं असं चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची ही आगळीवेगळी भूमिका पाहणं चाहत्यांसाठी परवणी ठरणार आहे.