ज्ञानवापी वादात आता अक्षय कुमारची उडी, पाहा काय दिली प्रतिक्रिया

ज्ञानवापी वादावर अभिनेता अक्षय कुमारने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Jun 1, 2022, 05:42 PM IST
ज्ञानवापी वादात आता अक्षय कुमारची उडी, पाहा काय दिली प्रतिक्रिया title=

मुंबई : अक्षय कुमारने ज्ञानवापी वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता अक्षय कुमारनेही काशी विश्वनाथ मंदिराच्या आवारात असलेल्या ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ते शिवलिंगासारखे दिसत आहे.

ज्ञानवापी वाद हा देशभर चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. यावरून सामाजिक आणि राजकीय चर्चा रंगल्या आहेत. त्यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री कंगना राणौतनेही याला शिवलिंग म्हटले आहे. या वादात अक्षय कुमारनेही उडी घेतली आहे.

अक्षय कुमारने नुकतीच या वादात उडी घेतली आहे. मंदिरातील शिवलिंगावर वक्तव्य करताना अक्षय कुमार म्हणाला, 'सरकार, एएसआय, पुरातत्व सर्वेक्षण आणि न्यायाधीश यांना याबद्दल सांगणे अधिक श्रेयस्कर आहे आणि त्यांना बरेच काही माहित आहे. मी व्हिडीओ पाहिला आहे, परंतु जास्त समजले नाही. दिसायला शिवलिंगासारखेच आहे, पण माझ्याकडे फारशी माहिती नसल्याने मी याबद्दल जास्त बोलू शकणार नाही.

अक्षय कुमारनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले

अक्षय कुमारने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. तो म्हणाला की, 'आपले पंतप्रधान खूप काम करतात आणि मी एका दिवसात इतके काम करू शकणार नाही'. अक्षय कुमारचा आगामी चित्रपट सम्राट पृथ्वीराज हा 3 जून रोजी प्रदर्शित होणारे. अक्षय कुमार व्यतिरिक्त मानुषी छिल्लर, संजय दत्त आणि सोनू सूद हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

अक्षय कुमारने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या चित्रपटांना चांगलीच पसंती मिळाली आहे, तर कंगना राणौतने ज्ञानवापी वादावर म्हटले आहे. काशीच्या प्रत्येक कणात महादेव राहतात.