करण जोहरने भन्साळी व्हायचा प्रयत्न केला पण..; व्हिडीओ पोस्ट करत फॅनने केली पोलखोल

Dhindora Song Troll: रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटातील ढिंढोरा गाणे ट्रोलिंगच्या निशाण्यावर आले आहे. काहीजणांनी करण जोहरवर चोरीचा आरोपही केला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 26, 2023, 01:21 PM IST
करण जोहरने भन्साळी व्हायचा प्रयत्न केला पण..; व्हिडीओ पोस्ट करत फॅनने केली पोलखोल  title=
Alia Bhatt and Ranveer Singh New Song Dhindora Baje Re Gets Compared With dola re dola

Dhindora Song Troll: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) या चित्रपटातून बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर पुन्हा एकदा पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. 28 जुलैला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याआधी काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील 'ढिंढोरा बजा रे' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणं अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. मात्र, काही जणांना या गाण्यातील डान्स स्टेप खटकल्या आहेत. यावरुन पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी करण जोहरवर निशाणा साधला आहे. करण जोहरने संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटातील एका गाण्याची चोरी केल्याचा आरोप केला जात आहे. 

इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रणवीर-आलिया 'ढिंढोरा' गाण्याच्या स्टेपवर डान्स करत आहेत. मात्र गाण्याचे बोल देवदास चित्रपटातीव 'डोला रे डोला' चित्रपटातील आहेत. दोन्ही गाण्यांचे क्रोसओव्हर अगदी परफेक्ट बसलेले पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत. काहींनी यावरुन करण जोहरला ट्रोल केले आहे. तर, संजय लीला भन्साळी यांच्या मास्टरपीस गाण्यातील काही स्टेप चोरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

'ढिंढोरा' गाण्यात नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमाचा सेट आहे. तर रणवीर आणि आलिया  लाल रंगाच्या ट्रॅडिशनल आउटफिटमध्ये दिसत आहेत. मात्र, या गाण्यातील स्टेप पाहून लोकांना ऐश्वर्या- माधुरीचे डोला रे डोला गाणं आठवलं आहे. लोकांनी त्या व्हायरल व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. करण जोहरने भन्साळी बनण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो फेल ठरला. असंच 'कलंक' चित्रपटातही करणने केले होते, असं एकाने म्हटलं आहे. 

हे गाण 'मेरे ढोलना', 'डोला रे डोला' आणि 'घर मोरे परदेसिया' या तीन गाण्यांचे मिश्रण आहे. तीन्ही गाण्यातील काही डान्स स्टेप चोरुन 'ढिंढोरा' गाण्यात वापरले आहेत, असंही एकाने म्हटलं आहे.  तर, एकाने म्हटलं आहे की, रणवीर आलियापेक्षा जबरदस्त डान्स करतोय. दरम्यान, अनेकांनी या गाण्यावरुन दिग्दर्शक करण जोहरला ट्रोल केलं आहे. 

'डोला रे डोला' गाण्यासोबत 'ढिंढोरा' गाण्याची तुलना केली आहे. आलिया भट्टला देखील ट्रोल केले आहे. गाण्यात आलिया अजिबात ग्रेसफुल वाटत नाहीये. माधुरी आणि ऐश्वर्यासारखं तिच्यात काहीच नाहीये, असं काहींनी म्हटलं आहे. दरम्यान, 'डोला रे डोला' गाण्याची कॉरिओग्राफी सरोज खान यांनी केली होती. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर, 'ढिंढोरा' या गाण्याची कोरियोग्राफी वैभवी मर्चेंट यांनी केली आहे.  दर्शना रावल आणि भूमी त्रिवेदी यांनी हे गाणं गायलं आहे.