आलिया भट्टच्या बॅगची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

 आलिया तिच्या स्टायलिश लुकसाठी चर्चेत... 

Updated: Jul 17, 2019, 05:18 PM IST
आलिया भट्टच्या बॅगची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनयासाठी तर ओळखली जातेच... त्याशिवाय आलिया क्यूटनेससाठीही ओळखली जाते. तिच्या धीरगंभीर अभिनयाबरोबरच आलिया तिच्या स्टायलिश लुकसाठीही चर्चेत असते. आलिया प्रत्येक लुकमध्ये आलिया स्टायलिश दिसते. 

आलियाचे अनेक चाहते तिच्या वेशभूषेवर तिला दाद देत असतात. नुकताच आलियाचा विमानतळावरील फोटो व्हायरल झाले आहे. या फोटोत आलिया तिच्या आईबरोबर म्हणजेच सोनी राजदान यांच्यासोबत दिसत आहे. विमातळावर आलिया एथलेटिक्स लुकमध्ये दिसत आहे. आलियाने या फोटोमध्ये फिक्कट जांभळ्या रंगाची पॅन्ट, पांढऱ्या रंगाचे टॉप आणि त्यावर चढवलेलं पॅन्टला मॅच होणारं जॅकेट अशा पेहरावात दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@aliaabhatt with mom snapped at the airport today . . . #Aliabhatt #sonirazdan #spotted #airport #travelling #airportlook #beauty #instagood #instalove #instadaily #bollywood #paparazzi #manavmanglani @manav.manglani #photooftheday

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

या फोटोत आलियाने पांढऱ्या रंगाच्या फ्रेम असलेले सन ग्लासेस आणि पांढऱ्या रंगाचे शूज घातलेले दिसत आहे. त्यावेळी आलियाच्या हातात मस्टर्स हैंडबॅग होती. पिवळ्या रंगाची ही बॅग फार आकर्षित वाटत होती. आलियाच्या या बॅगची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल... आलियाची ही बॅग लग्जरी डिजाइनर ब्रान्ड असून 'अन्या हिंदमार्च' ( Anya Hindmarch) या ब्रान्डची आहे. या बॅगची किंमत १,१९,४२२ रूपये इतकी आहे. ही बॅग फार स्टायलिश दिसते आणि आलियाच्या पोशाखाबरोबर ही बॅग कॉन्ट्रास्ट वाटत होती. परंतु, आलियाचा हा अंदाजही अफलातून असाच आहे. 

आलिया सध्या तिच्या आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. आलिया पहिल्यांदाच तिच्या खऱ्या प्रियकरसोबत अर्थात रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी  असून चित्रपटात आलिया आणि रणबीरशिवाय बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन हे स्टारसुद्धा मुख्य भूमिकेत रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

या चित्रपटात पहिल्यांदाच अभिनेत्री मौनी रॉय ही खलनायिकेच्या रुपात दिसणार आहे. 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट पुढच्या वर्षी उन्हाळ्यात प्रदर्शित होणार आहे.