रणबीरच्या आठवणीत आलियाची वाईट अवस्था, म्हणतेय शरीर इथे आणि आत्मा... 

रणबीर, राजामौली आणि अयान मुखर्जी यांनी चाहत्यांना तसंच मीडियाला भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

Updated: Jun 2, 2022, 01:32 PM IST
रणबीरच्या आठवणीत आलियाची वाईट अवस्था, म्हणतेय शरीर इथे आणि आत्मा...  title=

मुंबई : रणबीर कपूर आणि एसएस राजामौली आणि अयान मुखर्जी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये ब्रह्मास्त्रचं प्रमोशन केलं. विझागच्या प्रमोशनदरम्यान, या तिघांनी सिंहाचलममधील वराह लक्ष्मी नरसिंह मंदिरात आशीर्वादही घेतले.

रणबीर, राजामौली आणि अयान मुखर्जी यांनी चाहत्यांना तसंच मीडियाला भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

पत्रकार परिषदेदरम्यान आलिया भट्टने टीमला एक व्हिडिओ संदेश पाठवला. तिने सांगितलं की, ती तिच्या पहिल्या हॉलीवूड प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. तर तिचा "अर्धागिनी" म्हणजेच रणबीर विझागमधील कार्यक्रमाला उपस्थित आहे.

व्हिडिओ संदेशात आलियाने तिच्या चाहत्यांना आणि एसएस राजामौली यांना एक संदेश पाठवला आहे. तिने त्यांना तेलुगुमध्ये अभिवादन केलं आणि RRR वर इतकं प्रेम दिल्याबद्दल त्यांचे आभार मानलं.

ती म्हणाली, "अंदरिकी नमस्कारम.  बागुनारा? हे, नेनु कुदा नी तेलुगु अम्मायिन. ब्रह्मास्त्र नाकू एन्थो स्पेशल फिल्म  (सर्वांना नमस्कार. कसे आहात? अहो, मी पण तुमची तेलुगु मुलगी आहे. ब्रह्मास्त्र माझ्यासाठी खास चित्रपट आहे)."

त्यानंतर तिने आरआरआरचे दिग्दर्शकांना संदेश दिला. "नमस्कार राजामौली सर, कसे आहात? तुमच्यावर खूप प्रेम. आमच्या RRR चित्रपटावर त्यांनी दिलेल्या सगळ्या प्रेमाबद्दल मी सर्वांचे आभार मानण्याची ही संधी घेते. ते खरोखर आणि अत्यंत खास होतं. त्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन." .

ती पुढे म्हणाली की, तिला ब्रह्मास्त्र टीमसोबत रहायचं आहे.  “मी अयान, रणबीरची संपूर्ण टीम मिस करत आहे. जरी मी फिजिकली इथे आहे पण, माझं संपूर्ण  मन तिथे आहे, विशेषतः रणबीरच्या हृदयात.  मी तुमच्यासोबत आहे. ,

तो म्हणाली, "मला तिथे यायचं होतं. पण दुर्दैवाने किंवा सुदैवाने, मी लंडनमध्ये शूटिंग करत आहे.  हा एक मोठा चित्रपट आहे. पण मला असं वाटतं की, माझ्यापैकी निम्मे लोक या शोमध्ये तुमच्यासोबत राहाणार आहे."